Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…

नाझिया महेमूद शेख ऊर्फ नाजनीन असे आरोपी महिलेचे नाव आहे. यातील फिर्यादी हे नातेवाईकाच्या घाटकोपर येथील एका सोन्याच्या पेढीवर व्यवस्थापक म्हणून काम करणारे आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 21, 2026 | 09:29 AM
महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच...

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच...

Follow Us
Follow Us:
  • महिलेने केले ज्येष्ठ नागरिकाला ब्लॅकमेल
  • 2024 पासून बदनामीच्या भीतीच्या छायेत
  • ठार मारण्याची दिली धमकी
मुंबई : व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग आणि अश्लील चित्रीकरणाचा आधार घेत एका महिलेने ज्येष्ठ नागरिकाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे 4 कोटी उकळल्याचे उघड झाले आहे. पुन्हा तिने पाच लाख मागितल्यावर ज्येष्ठ नागरिकाने थेट पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पाच लाख रुपये स्वीकारताना आरोपी महिलेला रंगेहात पकडून अटक केली.

नाझिया महेमूद शेख ऊर्फ नाजनीन असे आरोपी महिलेचे नाव आहे. यातील फिर्यादी हे नातेवाईकाच्या घाटकोपर येथील एका सोन्याच्या पेढीवर व्यवस्थापक म्हणून काम करणारे आहेत. या पेढीत एका महिलेसोबत आरोपी महिला २०२० मध्ये आली होती. तेव्हापासून आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख वाढत गेली आणि २०२४ पासून तर एकमेकांना फोनाफोनी सुरू झाली.

2024 पासून बदनामीच्या भीतीच्या छायेत

२०२४ मध्ये नाझियाने त्यांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील व्हिडिओ चॅटिंग केले. काही दिवसांनी हे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन काही पैसे उकळले. पुन्हा काही दिवस गेल्यावर तिने अश्लील व्हिडिओ चॅटिंग हे इंटरनेटच्या माध्यमातून पोलिसांना, न्यायालयाला आणि सी.बी.आय. या विभागांना मिळाले असून, त्याच्या चौकशीमध्ये तिला बोलवण्यात आल्याचे तक्रारदारांना सांगितले. अशा धमकीमुळे तक्रारदारांनी बदनामीच्या भीतीपोटी २०२४ पासून ते अद्याप ४ रुपये कोटी एवढी रक्कम तक्रारदारांकडून उकळली.

ठार मारण्याची दिली धमकी

काही दिवस गेल्यावर पुन्हा हे चित्रीकरण मद्रास पोलिसांकडे पोहचले असून, त्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी ५ लाख मागितले, अशी थाप मारली. पैसे मिळणार नाहीत याची शंका आल्याने नाझियाने हात पाय तोडून ठार करेन, अशी धमकी दिली. वारंवार पैसे उकळले आणि दिले नाहीत तर मारणाची धमकी दिली. त्याऐवजी आता थेट पोलिस ठाणे गाठावे या विचाराने फिर्यादींनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. ही तक्रार नोंदवत असतानाच नाझियाचा नेमका फोन आला. त्यावेळी फोन स्पीकरवर ठेवल्याने पोलिसांनीही ऐकला.

घाटकोपर गुन्हे शाखेची कारवाई

खंडणी मागितल्याचा फोन पोलिसांनीही ऐकल्याने त्यांनी तात्काळ हालचाल करत त्या महिलेस एच. बी. एस. मार्गावरील राधाकृष्ण हॉटेलजवळ एका ठिकाणी पैसे घेण्यास तक्रारदारामार्फत बोलावले. त्यासाठी काही खऱ्या तर काही बनावट नोटा अशा ५ लाखांची रक्कम स्वीकारताना आरोपी महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई घाटकोपर विभागाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केली आहे.

लग्न ठरलं, दुसऱ्याच दिवशी बघण्याचा कार्यक्रम; क्रिकेट खेळताना ३५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू, रत्नागिरीत हळहळ

Web Title: A woman made an obscene video call to an elderly man and extorted 4 crores from him nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • crime news
  • Extortion Case
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…
1

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?
2

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात
3

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात

मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.