
crime (फोटो सौजन्य: social media)
हत्या तीन दिवसांपूर्वी?
देसाई खाडी लगतच्या एका निर्जनस्थळी ठेवलेल्या सुटकेसमधून तरुणीचा मृतदेह सापडला. मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे, ही हत्या तीन दिवसांपूर्वीच झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 दरम्यान असावे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतदेहाची स्थिती पाहता हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तो सूटकेसमध्ये भरून खाडीजवळील नाल्यात फेकून देण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिस तपासात काय समोर आले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येपूर्वी पीडितेवर बेदम मारहाण झाल्याचे काही ठोस पुरावे आढळून आले आहेत. यावरून हा प्रयत्न फक्त हत्या नव्हता तर महिलेवर पूर्वी अत्याचार किंवा जबर मारहाण केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह फेकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
गुन्हा दाखल व तपास सुरू
घटना समोर आल्यानंतर ऐरोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अज्ञात आरोपीविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे. आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, परिसरातील स्थानिकांशी चौकशी, तसेच हरवलेल्या महिलांच्या तक्रारींचा डेटा तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून, पोलिसांवर गुन्हे रोखण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. डोंबिवलीसारख्या गर्दीच्या भागात असा भीषण गुन्हा घडल्याने संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Ans: डोंबिवलीतील पलावा उड्डाणपुलाखाली सूटकेसमध्ये सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
Ans: तरुणीवर मारहाण व लैंगिक अत्याचार करून तीन दिवसांपूर्वी हत्या झाली असावी.
Ans: अज्ञात आरोपीविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.