सुसाईड नोटमध्ये काय?
महिला अँकरने आत्महत्या करण्यापूर्वी हृदय पिळवटून टाकणारी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये तिने असं लिहिलं आहे. हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे, मला माफ करा… .
ऑफिसला गेली पण परत आलीच नाही
प्राथमिक रिपोर्टनुसार, रितुमोनी २३ नोव्हेंबरला ऑफिसला गेली होती. पण शिफ्ट संपल्यावर रात्री घरी परत आलीच नाही. सोमवारी सकाळी तिचे सहकारी ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा रितुमोनिचा मृतदेह पाहून ते थक्क झाले. रितुमोनीच्या आत्महत्येमागील कारण आर्थिक असू शकते असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. पोलीस सर्व पैलूंचा बारकाईने तपास करत आहेत.
लग्नाला अवघे १२ दिवस बाकी…
आत्महत्या करणाऱ्या महिला अँकरचं पुढच्या महिन्यात ५ डिसेंबरला लग्न होणार होतं. लग्नाचे कार्डही वाटले गेले होते. घटनेच्या पहिल्या रात्री ती एका मित्राच्या घरी प्री-वेडिंग समारंभात सहभागी झाली होती, त्यानंतर ती ऑफिसला आली आणि नंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरु आहे. रितुमोनीने याआधी अनेक डिजिटल मीडिया संस्थांमध्ये काम केले आहे.
Ans: तिने आपल्या डिजिटल न्यूज पोर्टलच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
Ans: “हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे, मला माफ करा.” असे तिने लिहिले होते.
Ans: कुटुंबीयांच्या मते आर्थिक विवंचना कारणीभूत असू शकते; पोलिस सर्व कोनातून तपास करत आहेत.






