
crime (फोटो सौजन्य: social media)
कशी समोर आली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने नुकतंच तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद प्रकाराबद्दल सांगितलं. आरोपी महेशच्या घाणेरड्या कृत्याला कंटाळून पीडितेने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तिच्या मित्रांना आणि साथीदारांना सांगितलं. पीडितेला बोलता येत नसल्याने तिने हातवारे करूनच या प्रकरणाबाबत तिच्या मैत्रिणींना सांगितले. यामध्ये आरोपीने तरुणीला नशेचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं पीडितेने सांगितलं. हा घृणास्पद प्रकार २००९ मध्ये तिच्यासोबत ही घटना घडली. त्यावेळी ती अल्पवयीन होती. एवढेच नाही तर आरोपीच्या वागण्याला वैतागून दुसऱ्या तरुणीने सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा माहिती आहे.
काय घडलं तिच्यासोबत
पीडित तरुणी ही मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रहिवासी आहे. २००९ मध्ये तिची मैत्रीण तिला फिरायला जाण्याच्या बहाण्याने सांताक्रूझच्या वाकोला येथे आरोपी महेशच्या घरी घेऊन गेली. तिथे, आरोपीने पीडितेचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने समोसे आणि ड्रिंक्स पाजले, ज्यात मादक पदार्थ मिसळण्यात आला होता. काही वेळानंतर, तिची मैत्रीण तिथून निघून गेली.
पीडित तरुणीने सांगितलं की, तिची मैत्रीण महेशच्या घरातून निघून गेल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं आणि त्या घटनेचा व्हिडीओ सुद्धा बनवला. त्यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पीडिता पुढे म्हणाली की, बराच काळ तिने या भयानक घटनेबद्दल कोणाला काहीच सांगितलं नाही. आरोपी महेश तिला सतत धमक्या देत होता. त्यामुळे समाजाच्या भीतीमुळे ती कोणाला काहीच सांगू शकली नाही. अखेर तरुणीने धाडस दाखवलं आणि आपल्या पतीला या घटनेबद्दल सांगितले.
त्याने एकाच महिलेवर नाही तर…
या घटनेनंतर पीडित तिच्या पती आणि काही मित्रांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिथे पीडितेच्या जबाबाच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपी महेश पवाराला पालघरच्या विरार परिसरातून ताब्यात घेतले. तपासणीत आरोपीने केवळ एकाच महिलेवर नाही तर अश्या अनेक महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महेश पीडितांना बळजबरीने व्हिडीओ कॉल करायला लावायचा आणि त्यावेळी त्यांचे अश्लील व्हिडीओ शूट करायचा. एवढेच नाही तर त्याच व्हिडिओच्या आधारे नंतर त्यांना ब्लॅकमेल करत होता. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Ans: 2009 मध्ये वाढदिवसाच्या बहाण्याने मादक पदार्थ मिसळलेले अन्न देऊन अत्याचार करण्यात आला.
Ans: आरोपीकडून सतत धमक्या व समाजाच्या भीतीमुळे पीडिता गप्प राहिली.
Ans: तक्रारीनंतर काही तासांत आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.