Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: चरित्रावर संशय! पतीने मध्यरात्री पत्नीचा जीव घेतला; सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन कबुली

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने मध्यरात्री तिची दगडाने ठेचून हत्या केली. अपराध केल्यानंतर सकाळी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 21, 2025 | 09:21 AM
पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; सोन्याचे दागिने काढून घराबाहेरही हाकलले

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; सोन्याचे दागिने काढून घराबाहेरही हाकलले

Follow Us
Close
Follow Us:
  • पतीला पत्नीच्या चरित्रावर संशय होता.
  • मध्यरात्री दगडाने ठेचून निर्घृण हत्या.
  • सकाळी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली.
मुंबई : मुंबईच्या मालाड-मालवणी परिसरात वैवाहिक वादातून उद्भवलेली एक धक्कादायक हत्या समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने मध्यरात्री दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना मालवणी कच्च्या रोड आडवा पट्टा परिसरात घडली. आरोपी पतीचे नाव सिराज नाईक (वय 56) तर मृत महिलेचे नाव मुमताज असून दोघेही याच परिसरात वास्तव्यास होते.

काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सिराज नाईक हा अनेक दिवसांपासून आपल्या पत्नी मुमताजवर चारित्र्याचा संशय घेत होता. तिचे इतर पुरुषांसोबत संबंध असल्याचा आरोप करून तो सतत तिच्याशी वाद घालत असे. यामुळे त्यांच्या घरात नेहमीच तणावाचे वातावरण निर्माण होत होते. बुधवारी रात्री उशिरा, अंदाजे अडीचच्या सुमारास, दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संशयाचा मुद्दा पुन्हा समोर आल्यानंतर सिराजचा राग अनावर झाला आणि त्याने हाताशी आलेल्या दगडाने मुमताजवर वार करत तिला ठेचून ठेचून ठार मारले.

Nanded Crime: संतापजनक! 7 वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाकडून अत्याचार; आरोपी अटकेत

घटनानंतर पतीचे धक्कादायक पाऊल

पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने पळून जाण्याचा किंवा पुरावा लपवण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट सकाळी तो थेट मालवणी पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना शांतपणे संपूर्ण घटना सांगत हत्येची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ पथक घटनास्थळी रवाना केले. तेथे मुमताज गंभीर अवस्थेत आढळली. तिला तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांचा तपास

मालवणी पोलिसांनी सिराज नाईक याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलमान्वये खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सखोल तपास सुरू आहे. परिसरात या घटनेमुळे संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनीही अशा प्रकारच्या वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.

Akola Crime: अकोला हादरलं! शेतात अज्ञात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला; हत्या की काही वेगळं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: संशय

  • Que: आरोपीने गुन्ह्यानंतर काय केले?

    Ans: सरेंडर

  • Que: पोलिसांनी पुढे काय केले?

    Ans: अटक

Web Title: Mumbai crime husband kills wife in the middle of the night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 09:21 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना! नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप
1

Pune Crime: पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना! नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप

Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या
2

Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या

LPG Gas Shortage: युद्धाचा फटका! छोट्या व्यवसायिकांचा जीवन संघर्ष रस्त्यावर! मुंबईतील चायनीज गाडी व्यवसाय संकटात
3

LPG Gas Shortage: युद्धाचा फटका! छोट्या व्यवसायिकांचा जीवन संघर्ष रस्त्यावर! मुंबईतील चायनीज गाडी व्यवसाय संकटात

KEM Hospital : केईएममध्ये ‘व्हिडिओ-ईईजी’द्वारे फिटचे उगमस्थान शोधणे शक्य
4

KEM Hospital : केईएममध्ये ‘व्हिडिओ-ईईजी’द्वारे फिटचे उगमस्थान शोधणे शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.