काय घडलं नेमकं?
वसई पश्चिमेच्या अनुपम घर संकुल या सोसायटीत राहणारे अतुल कोंढारे यांचा त्याच सोसायटीत राहणारा व व्यवसायाने रिक्षा चालवणारा आरोपी संदीप पवार याच काही दिवसापूर्वी किरकोळ अंतर्गत वाद झाला होता. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सोसायटीतील लहान मुलं खेळत असताना, अतुल कोंढारे यांचा चार वर्षाचा मुलगा विघ्नेश हा देखील मुलांबरोबर खेळत होता. खेळता खेळता विघ्नेश हा रिक्षात बसला. त्याचवेळी आरोपी संदीप हा रिक्षाजवळ आला आणि त्याने इतर मुलांना हाकलून दिलं. त्याने विघ्नेशला पकडून त्याचं डोक रिक्षाच्या मिटरच्या बाजूला असलेल्या लोखंडी अँगलवरती आपटलं. त्याला रिक्षातून पायाला धरून जोरात खेचलं आणि त्याच पाय पकडून जोरात हवेत भिरकावत डोक्यावर आपटलं.
एवढ्यावरच न थांबता संदीपने त्याला पायला धरुन फरफटत नेलं. आणि पहिल्या मजल्यावरील शिडीवर घेवून जाऊनही मारहाण केली. विघ्नेशची आजी त्याला सोडवण्यासाठी गेली असता, तिला ही या नराधमाने मारहाण केली. सोसायटीच्या सीसीटीव्हीत हे दृश्य कैद झाले असून, याचा संताप आता व्यक्त होत आहे.
रक्ताच्या उलट्या
त्यानंतर या सगळ्याबाबत शेजाऱ्यांनी अंगावर काटा आणणारी माहिती सांगितली. संदीप याने चिमुकल्या विघ्नेशला दोन- तीनवेळा जमिनीवर जोरात आपटले. एखादा कपडा धुताना आपटावा तसा त्या लहानग्या चिमुरड्याला आपटले. त्याला रुग्णालयात नेले तेव्हा विघ्नेशने रक्ताच्या उलट्या केल्या. डॉक्टरांनी विघ्नेशची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत त्याला आयसीयू वॉर्डमध्ये ठेवले.
गुन्हा दाखल
संदीपला आपल्या कृत्याबद्दल जरासाही पश्चाताप वाटत नव्हता. ‘मी बदला घेतला’ अशा आवारभावात तो निर्लज्जपणे सोसायटी सदस्यांना हा सगळा प्रकार सांगत होता. आरोपी संदीप वर वसई पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम 109(1), 115(2), 351,(3), 352 सह अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) 201 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
Ans: वडिलांशी झालेल्या किरकोळ वादाचा राग मुलावर काढण्यात आला.
Ans: मुलाची प्रकृती गंभीर असून ICU मध्ये उपचार सुरू आहेत.
Ans: आरोपीला अटक करून संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.






