Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai crime: उंदरांनी खाल्ले मासे, संशय मित्रावर, मित्रांनीच तरुणाची केली हत्या; 50 कचरा वेचकांची चौकशी आणि…

मुंबईमधील गोरेगावयेथे मासे खाल्ल्याच्या संशयातून दोन मित्रांनी अफसर (35) याची दगडाने ठेचून हत्या केली. आरोपी हरियाणाला पळून गेले होते; पोलिसांनी त्यांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 14, 2026 | 11:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गोरेगाव येथे मासे खाण्यावरून वादातून खून.
  • दोन मित्रांनी अफसरची दगडाने ठेचून हत्या केली.
  • आरोपी हरियाणातील कैथल येथून अटकेत.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मासे खाण्यावरून एका मित्राचीच हत्या केल्याचे समोर आले आहे. अफसर (३५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या दोन मित्रांनीच त्याची दगडाने ठेचून हत्या केली. ५० कचरा वेचकांची चौकशी केल्यांनतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुंबईच्या गोरेगाव येथे घडली.

काय घडलं नेमकं?

23 फेब्रुवारीच्या सकाळी अफसर त्याचा मित्र सुरेश आणि राजेश ऊर्फ नेपाली यांच्यासोबत मासे घेऊन आला होता. मासे शिजवत असताना तिघांनीही मद्यपान केले. मात्र, दारुच्या अतिसेवनामुळे अफसर तिथेच झोपी गेला आणि याच दरम्यान कढईत ठेवलेले मासे उंदरांनी खाल्ले. काही वेळाने सुरेश अंडी राजेश जेवणासाठी उठले आणि त्यांना कढई रिकामी दिसली. अफसारने एकट्यानेच सर्व मासे खाऊन टाकले असावेत असा संशय या दोघांना आला. याच रागाच्या भरात दोघांनी आधी अफसर;या लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल. त्यांनतर दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. या भीषण कृत्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट हरियाणाला पळून गेले.

Ahilyanagar Crime: बेपत्ता तक्रार देणारा मुलगाच निघाला खुनी, मुलगा-जावयानेच वडिलांची केली हत्या; तपासात धक्कादायक माहिती समोर

पोलिसांना मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावरून अफसारचा मृतदेह ताब्यात घेतले आणि पंचनामा केला. त्यांनतर वनराई पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी परिसरात मोठी शोधमोहीम राबवली. पोलिसांनी परिसरातील सुमारे ५० कचरा वाचकांची कसून चौकशी केली आणि मृतदेहाचा फोटो दाखवून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. या चौकशीतून पोलिसांना आरोपींच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती मिळाली.तांत्रिक तपासाअभावी केवळ गुप्तचरांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला आणि अखेर हरियाणाच्या कैथल येथून सुरेश आणि राजेश या दोघांनाही अटक करण्यात यश मिळवले.

आरोपी सराईत गुन्हेगार

आरोपी राजेश उर्फ नेपाली हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत असे तपासादरम्यान समोर आले. उंदरांनी खाल्लेल्या माशांमुळे मित्राचा नाहक बळी गेला असून, सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सूरु आहे.

Ratnagiri Crime: संतापजनक! रत्नागिरीत अल्पवयीन मुलावर अत्याचार; कृत्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना मुंबईमधील गोरेगाव येथे घडली.

  • Que: खून का करण्यात आला?

    Ans: मासे एकट्याने खाल्ल्याच्या संशयातून रागाच्या भरात दोघांनी अफसरची हत्या केली.

  • Que: आरोपींना कसे पकडले?

    Ans: पोलिसांनी चौकशी व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना हरियाणा येथून अटक केली.

Web Title: Mumbai crime rats ate the fishfriend suspected friends themselves murder the youth 50 rag pickers interrogated and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?
2

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
4

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.