
crime (फोटो सौजन्य: social media)
मुंबई: मुंबईतील बोरिवली पूर्व परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ६५ वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून ९ वर्षीय लहान मुलीवर लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास घडली.
नेमकं काय घडलं?
संध्याकाळी सातच्या सुमारास ९ वर्षाची लाजणं मुलगी लिफ्टमधून घरी जाण्यासाठी निघाली तेव्हा शेजारी राहणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी यांनी लिफ्टमध्ये नववर्षीय चिमुरडीला ओडलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचाराची सर्व घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितलं. आईने या घटनेची तक्रार कस्तुरबा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली.
पोलिसांनी तक्रारीची गंभीरता पाहत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला कस्तुरबा मार्क पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केले. कोर्टाने आरोपीला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यासंदर्भात कस्तुरबा मार्ग पोलीस अधिक तपास करत आहे.
दारूच्या नशेत १४ वर्षीय मुलीवर आणि पत्नीवर ब्लेडने केले वार
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षाची मुलगी झोपेत असतांना तिच्या वडिलांनी तिचा ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. दरम्यान तिला वाचवायला गेलेल्या पत्नीवरही आरोपीने ब्लेडने हल्ला केला. हनुमंत सोनवळ (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना सोमवारी उशिरा रात्री दहिसर येथील कोकणी पाडा येथे घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
रात्री सव्वादोनच्या सुमारास झोपेत असतांना मुलीला काहीतरी चावल्यासारखे वाटले आणि तिला वेदना झाल्या. त्यावेळी तिला वडिलांनी आपला गळा चिरल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिने आरडाओरडा केला तिला वाचविण्यासाठी आलेल्या पत्नी राजश्रीच्या पोटावरतीही ब्लेडने वार केला. या घटनेननंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी मायलेकींना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आरोपी हनुमंताला अटक करण्यात आली आहे.
Ans: लिफ्टमध्ये करण्यात आला ९ वर्षीय मुलीवर अत्याचार.
Ans: अत्याचार करणारा निवृत्त पोलीस अधिकारी
Ans: कोर्टाने आरोपीला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.