Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: धक्कादायक! मिरा-भाईंदरमध्ये घरकामगार महिलेची निर्घृण हत्या; आरोपी फरार

मिरा-भाईंदरच्या काशीमिरा परिसरात 40 वर्षीय घरकामगार महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. अनेक वारांमुळे तिचा मृत्यू झाला. पोलिस व फॉरेन्सिक टीम तपासात असून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2026 | 08:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरकामगार महिलेची धारदार शस्त्राने हत्या
  • पोट, छाती व मानेवर गंभीर वार
  • पोलिस व फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू
मुंबई: मुंबईच्या मिरा- भाईंदरमधील काशीमिरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४० वर्षीय घरकामगार महिलेची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव सुमन असे आहे.

चाकूने सपासप वार

सुमन ही चंदेश अ‍ॅकॉर्ड या निवासी संकुलात अनेक घरांमध्ये घरकाम करत होती. मंगळवारी चंदेश अ‍ॅकॉर्ड बिल्डिंग क्रमांक 27 मधील एका घरात तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले असून, तिच्या पोटात दोन, छातीत एक आणि मानेवर एक असे गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला तात्काळ गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Crime News: प्रेयसीसाठी पत्नीचा खून! 6.70 लाखांची सुपारी अन्…; पतीच्या भयानक हत्याकांडाचा दीड वर्षांनी थरारक खुलासा

आरोपी फरार

या घटनेची माहिती मिळताच काशीमिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. त्याच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

दारू पिण्यावरून वाद, पतीच्या बेदम मारहाणीत 29 वर्षीय पत्नीचा मृत्यू; फरार पतीला अटक

मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारू पाण्यावरून नवरा- बायकोमध्ये वाद झाला. याच वादातून नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेची ओळख कविता महेश वाड (वय २९) अशी आहे. तर आरोपीचे नाव महेश नारायण वाड असे आहे. हत्या केल्यांनतर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

काय घडलं नेमकं?

महेशने आपल्या पत्नी कविताची निर्घृणपणे हत्या केली. तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, त्यात ती गंभीर जखमी झाली. नंतर कविताला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वेळेवर उपचार न झाल्याने तिची प्रकृती खालावली. शवविच्छेदनातून समोर आले की, कवितावर अत्यंत गंभीर शारीरिक हल्ला झाला होता. तिच्या शरीरावर अनेक काळे-निळे डाग होते.

 

गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ दोघांना न्यायालयाने दिली ‘ही’ मोठी शिक्षा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मिरा-भाईंदरच्या काशीमिरा परिसरात.

  • Que: पीडित महिला कोण होती?

    Ans: सुमन, 40 वर्षीय घरकामगार महिला.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: घटनास्थळी तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Mumbai crime shocking domestic worker brutally murdered in mira bhayandar accused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.