Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: दादरमध्ये थरार! जुन्या वैमनस्यातून पत्नीसमोरच तरुणाची हत्या; सहा जणांना अटक

मुंबईतील दादरमध्ये जुन्या वैमनस्यातून 40 वर्षीय अंकुश आंबोरकर यांची पत्नीसमोर बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. गौरव सणस व टोळक्यावर गुन्हा दाखल; पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2026 | 09:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्नीसमोरच तरुणाची बेदम मारहाण करून हत्या
  • जुना वैयक्तिक वाद कारणीभूत
  • सहा आरोपी अटकेत, पोलिस तपास सुरू
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या देखत बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईतील दादर परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अंकुश आंबोरकर (वय ४०) असे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Amravati Crime: परतवाडा हादरलं! 19 वर्षीय युवकावर तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, SIT चौकशीची मागणी

काय घडलं नेमकं?

अंकुश आंबोरकर हा रविवारी रात्री दादरमध्ये आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी गौरव सणस याने त्याला रस्त्यात अडवले. याठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. गौरव सणस आणि त्याच्या साथीदारांनी अंकुशला मारहाण सुरु केली. अंकुशची पत्नी प्रभादेवी परिसरात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करते. इथून काही अंतरावरच अंकुशला मारहाण सुरु होती. ही बातमी समजताच अंकुशची पत्नी आपल्या काही सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेली. तिने अंकुशला गौरव आणि त्याच्या साथीदारांच्या तावडीतून सोडवले.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

दरम्यान, गौरव आणि त्याच्या टोळक्याने अंकुशला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दीही जमा झाली होती. गौरव आणि त्याच्या साथीदारांनी तिथून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अंकुशला नजीकच्या केईएम रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी अंकुशचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

हत्ये मागचं कारण काय?

अंकुशच्या पत्नीने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून दादर पोलिसांनी गौरव सणस आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. अंकुश आंबोरकर आणि गौरव सणस यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक वाद होता. अंकुश आणि गौरव हे दोघे पूर्वी दादरमध्ये एकत्र बँजोचा व्यवसाय करायचे. मात्र, कालांतरान दोघांमध्ये वितुष्ट आल्याने दोघेही वेगवेगळे झाले होते. या दोघांनी 2017 मध्ये स्वतंत्रपणे बँजोचा व्यवसाय सुरु केला होता. इथेच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. तेव्हापासून गौरव सणस हा अंकुशवर डुख धरुन होता. गौरव अंकुशला सतत टोमणे मारायचा, धमकी द्यायचा, अशी माहिती अंकुशच्या पत्नीने पोलिसांना दिली. यापूर्वीही गौरव याने अंकुशला मारहाण केली होती. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती.

पोलीस तपास सुरु

आता अंकुशला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. पोलिसांनीच आता पर्यंत सहा जणांना अटक केली आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली अन् अडीच लाखही उकळले

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: जुन्या वैयक्तिक वादातून हल्ला करण्यात आला.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील दादर परिसरात.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सहा आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Mumbai crime shocking incident in dadar young man murdered in front of his wife over old enmity six arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Amravati Crime: परतवाडा हादरलं! 19 वर्षीय युवकावर तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, SIT चौकशीची मागणी
1

Amravati Crime: परतवाडा हादरलं! 19 वर्षीय युवकावर तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, SIT चौकशीची मागणी

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवाशांसाठी ठरणार ‘गेम चेंजर’
2

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवाशांसाठी ठरणार ‘गेम चेंजर’

Palghar : “शेखने म्हस्के बनून हिंदू तरुणीशी केले लग्न?” पालघर जिल्ह्यात लव्ह जिहादच्या आरोपाने खळबळ
3

Palghar : “शेखने म्हस्के बनून हिंदू तरुणीशी केले लग्न?” पालघर जिल्ह्यात लव्ह जिहादच्या आरोपाने खळबळ

Gadchiroli Crime: गडचिरोलीत थरार! मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; कारण काय?
4

Gadchiroli Crime: गडचिरोलीत थरार! मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.