crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबई: मुंबईच्या दिंडोशी येथील संतोष नगर परिसरातून एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. एका ४४ वर्षाच्या आरोपीने ५ ते ६ अल्पवयीन मुलींचा विनय भंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा घरात पाळणाघर आणि ट्युशन चालवायचा. अनेक लहान मुलं या आरोपीच्या घरी पाळणाघरात आणि ट्युशनसाठी जायचे. आरोपीच्या घराशेजारी राहणारी ७ वर्षाची मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनसाठी आली. तेव्हा त्या मुलीला आरोपीने बेडरूममध्ये घेऊन गेला. यानंतर मुलीला मोबाईलमध्ये गेम खेळण्यासाठी देऊन त्याने मुलीचा विनयभंग केला.
हा प्रकार माहिती पडताच दिंडोशी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर तपासात त्याने आतापर्यंत 5 ते 6 लहान मुलींसोबत अश्याप्रकारे त्याने विनयभंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला दिंडोशी पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजार केले असता कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
मित्रानेच दगडाने ठेचून केली मित्राची हत्या…
दरम्यान कोल्हापुरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कणंगला येथे जीवलग मित्राचाच दगडाने ठेचून मित्राने खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली.आनंदा ऊर्फ देमानी सुरेश डुकरे (वय २०, रा. सेनापती कापशी, ता. कागल) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आनंदाचे वडील सुरेश डुकरे हे मूळचे कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील होमनाळी गावचे रहिवासी आहेत. गवंडी कामाच्या निमित्ताने वीस वर्षांपूर्वी ते सेनापती कापशी येथे स्थायिक झाले. त्यांचा मुलगा आनंदा शाळा सोडून वडिलांसोबत गवंडी काम करत होता. आनंदाची संशयित अल्पवयीनशी मैत्री झाली. वर्षभरापासून संशयित अल्पवयीन हा आनंदाच्याच घरी जेवण व राहण्यासाठी होता.
गेले सहा-सात महिने तो कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यानंतर पुन्हा अलीकडे काही दिवसांपासून हे दोघे कापशी परिसरात एकत्रच फिरत होते. दोघांची खास मैत्री असल्याने विविध ठिकाणी कामे घेऊन दोघे एकत्रच काम करत होते. रविवारी आनंदाचे आई-वडील पाहुण्यांच्या गावी गेले होते. ती संधी साधून आनंदा व संशयित अल्पवयीनाने घरातील तिजोरी फोडून किरकोळ दागिने व काही रोख रक्कम चोरून दोघेही कापशीहून निपाणीमार्गे कणंगला येथे गेले.