Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: समलैंगिक संबंधाची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी; प्रसिद्ध सीएने विष प्राशन करून संपवलं जीव

समलैंगिक संबंधाची अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत दोघांनी तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी उकळली. याच सततच्या त्रासाला कंटाळून एका अकाउंटंटने आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2025 | 11:45 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईच्या वाकोला परिसरातून एका अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध सीएने विष प्रश्न करून टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. समलैंगिक संबंधाची अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत दोघांनी तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी उकळली. याच सततच्या त्रासाला कंटाळून एका चार्टर्ड अकाउंटंटने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या सीएचे नाव राज मोरे (वय ३२) आहे. या प्ररकरणी वाकोला पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या; टॉवेलने गळफास घेऊन संपवलं जीवन

नेमकं काय प्रकरण आहे?

पुढे आलेल्या माहितीनुसार, वाकोला परिसरात नामांकित चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे याला शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेलिंग करण्याची धमकी देत करोडोंची खंडणी उकळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पीडित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोपही या आरोपींवर करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव राहुल शेरू पारवाणी (वय 26) आणि सभा इकबाल अहमद कुरेशी (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात 108, 308(2), 308(3), 3(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज मोरे हा आपल्या आईसोबत सांताक्रूझ येथे रहात होता. राज शीव येथील एका कंपनीत कामालाही होता. राज याची इन्स्टाग्रामच्या समाजमाध्यमावर राहुल पारवानी याच्यासोबत सप्टेंबर 2024 मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. दोघे नियमित भेटत होते. अश्यातच दोघांचे शारीरिक संबंध होते. मात्र राहुलची सहकारी सबा कुरेशी याने या संबंधाची अश्लील चित्रफित तयार केली. आणि यानंतर या व्हिडीओच्या आधारे राहुल आणि सबा या दोघांनी राजला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली. त्यातून त्याला करोडोची खंडणी मागण्यात आली. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून अखेर हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या चार्टर्ड अकाउंटंटने टोकाच पाऊल उचललं आणि विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

सापडली भावनिक चिठ्ठी

राज मोरे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. चिठ्ठीत त्याने आपल्या आईसाठी लिहिली आहे. “माझी प्रिय आई, मला माफ कर, मी एक चांगला मुलगा नाही होऊ शकलो. तुला माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण मीच तुला एकटं सोडून जात आहे. मी माझ्या कर्माची फळं भोगतो आहे. देव तुला पुढच्या आयुष्यात माझ्यासारखा मुलगा कधीही देऊ नये. मी खूप वाईट वागलो आहे, पूनम मावशी, माझ्या आईची काळजी घ्या. माझी विविध खात्यांमध्ये पॉलिसी आहेत, ते पैसे घ्या आणि माझ्या आईला द्या. मला माफ करा,” असे राजने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

‘लवकरच जेवणासाठी घरी येतो’ म्हणत जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या; अटल सेतूवरून खाडीत उडी

Web Title: Mumbai crime threat to make video clip of same sex relationship viral famous ca commits suicide by consuming poison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
2

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
4

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.