
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
पीडित मुलगी ही मुलुंड परिसरात आपल्या पालकांसोबत राहते. सोमवारी (१२ जानेवारी) तिच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. रात्री उशिरा हे सर्वजण नाहूर येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी जमले होते. याच ठिकाणी मैत्रिणीच्या ४६ वर्षीय वडिलांनी संधी साधून पीडित मुलीशी अश्लील चाळे केले. त्याने पीडितेच्या छातीला स्पर्श करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.
मुलगी घाबरली, मुलीने घरी गेल्याबरोबर सर्व प्रकार आपल्या आईला सांगितलं. पीडितेच्या आईने आरोपीला या कृत्याबाद्दल जावं विचारला असता, त्याने आपली चूक मान्यकरण्या ऐवजी उलट त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. पीडित मुलीच्या कुटुंबाने भांडुप पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. भांडुप पोलिसांनी भारतीय न्याय संहितेसह ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत कठोर गुन्हा दाखल केला आहे. पोलसांनी ४६ वर्षीय आरोपीला अटक केली असून तपास करत आहे.
मकरसंक्रांतीत नायलॉन मांजाचा कहर; अंधेरी उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा चिरला गळा, थोडक्यात बचाव
पुन्हा एकदा मकरसंक्रांतीत नायलॉन मांजाचा कहर पाहायला मिळाला आहे. अंधेरी उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार जात असतांना नॉयलॉन मांज्यामुळे जीवघेणा अपघात झाला. यात दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती मांजा अडकल्याने खोलवर जखम झाली. त्याला सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव भारत कदम (४५,बोरिवली) असे आहे.
थोडक्यात बचावली श्वसननलिका
भारत कदम यांच्या गळ्याला खोल जखम झाली. उपचारासाठी प्लास्टिक सर्जन आणि इतर डॉक्टरांना रुग्णालयात बोलावण्यात आले आहे. जखम श्वसननलिकापर्यंत खोल होती, मात्र सुदैवाने श्वसननलिकाला इजा झालेली नाही. गळ्यात दोन्ही बाजूंना जखमा झाल्या असून, अनेक टाके घालण्यात आले आहेत. भारत कदम यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
Ans: पीडित मुलगी 13 वर्षांची आहे.
Ans: भारतीय न्याय संहिता व POCSO कायद्यानुसार.
Ans: आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.