काय घडलं नेमकं?
संजूकुमार होसमानी असे या 48 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. ते बीदर जिल्ह्यातील तालमडगी पुलाजवळून आपल्या दुचाकीवरून जात होते तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. रस्त्यावर आडव्या आलेल्या मांजाचा संजूकुमार यांना अंदाज आला नाही आणि तो थेट त्यांच्या गळ्याला अडकला. मांजा इतका ताणलेला आणि धारदार होता की त्यामुळे त्यांच्या गळ्यावर खोलवर जखम झाली. ते दुचाकीवरून खाली पडले, प्रचंड रक्तस्त्राव होत होता तरीही त्यांनी मोबाईल काढून त्यांच्या मुलीला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.
स्थानिक धावले मदतीसाठी मात्र…
ज्यावेळेवर ही घटना घडली तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र त्याने आपल्याजवळील कपड्याने संजूकुमार यांच्या गळ्यातील जखम दाबून धरली जेणेकरून रक्तस्त्राव थांबावा. स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले. परंतु रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. संजूकुमार यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर त्यांचे प्राण वाचले असते, असा संताप आता व्यक्त केला जात आहे.
नायलॉन मांजा जीवघेणा
मकर संक्रातीला अनेक लोक पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजाचा वापर करतात. हा मांजा अत्यंत धोकादायक आणि जीवघेणा आहे. दुचाकीस्वारांना वेगात असतांना बारीक डोरा दिसत नाही. त्यामुळे तो थेट गळ्याला घासल्या जातो. यामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. अनेक अश्या घटना दरवर्षी समोर येतात.
नायलॉन मांजा बॅन
नायलॉन किंवा चायनीज मांजा हा अनके राज्यात बॅन आहे. या मांजाच्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते. तरीही लोक या मांज्याची खरेदी करतात आणि लोकांचे जीव धोक्यात टाकतात. आता हा मांज्या रोखण्यात मोठे आव्हान आता समोर उभे ठाकले आहे.
Pune Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई; १६ लाखांची विदेशी दारू जप्त
Ans: कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यातील तालमडगी पुलाजवळ.
Ans: धारदार नायलॉन मांजाने गळा कापला जाणे.
Ans: नाही, त्यावर बंदी आहे; तरीही छुप्या पद्धतीने विक्री होते.






