Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

मुंबईतील मालाडमध्ये बंद डे केअर सेंटरमधील डीप फ्रीझरमध्ये तब्बल चार वर्षांपासून मृतदेह ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. क्रायोनिक्सच्या उद्देशाने हा मृतदेह जतन केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असून, प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 01, 2026 | 11:10 AM
Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Follow Us
Follow Us:
  • पार्सलमधून मिळालेल्या माहितीनंतर डे केअर सेंटरमध्ये आढळला मृतदेह
  • ६७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह चार वर्षे फ्रीझरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती
  • कुटुंबीयांच्या उपस्थितीत बुधवारी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले
मुंबईतील मालाड येथील एका डे केअरमधून पोलिसांनी ४ वर्षांपासून तिथे दडवून ठेवलेल्या मृतदेहाचा खुलासा केला. बुधवारी कुटुंबियांच्या उपस्थितीत यावर अंतिम संस्कार करण्यात आले पण आता प्रश्न असा पडतो की, या रहस्यमयी केसची पार्श्वभूमी काय? हा मृतदेह तिथे कुठुन आला आणि ४ वर्षे तिथे तो कुणी लपवून ठेवला? चला या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

पार्लसच्या मदतीने झाला खुलासा

सोमवारी कुरार पोलिस स्ठानकात एक पार्सल डिलिव्हर झाले. पण पोलिस स्टेशनात दररोज असे अनेक पार्सल येत असल्याने याकडे फार लक्ष न देता या अज्ञात पार्सलाल रिसिव्ह करण्यास सुरुवातीला नकार देण्यात आला. यानंतर रॅपिडोवरून पत्ता मिळालेल्या त्या व्यक्तीने ते पार्सल मालाडच्या कोकणीपाडा येथील एका पाळणाघरात नेले. तिथे त्याने ते पार्सल एका व्यक्तीला दाखवले, ज्याच्याकडे त्यावर पत्ता लिहिलेला होता. ते पाळणाघर अनेक महिन्यांपासून बंद असल्याने, त्या व्यक्तीने कुरार पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पार्सल ओपन करुन जेव्हा त्यातील माहिती वाचली तेव्हा ते वाचून पोलिस स्तब्ध झाले. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची माहिती दिल्यानंतर सायंकाळपर्यंत पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मिळालेल्या पार्सलमध्ये पाळणाघरात ठेवलेल्या डेड बाॅडीची माहिती देण्यात आली होती. यामुळेच पोलिसांनी सेंटरच्या मालकाला सर्वप्रथम काॅल केला. मालकाच्या मृत्यूनंतर, सध्याचे संचालक, डॉ. अहमद सय्यद, आले आणि त्यांच्या मदतीने केंद्राचे कुलूप उघडण्यात आले व क्लिनिकमधील डीप फ्रीझर उघडण्यात आला. आतमध्ये भरपूर दुर्गंधी पसरली होती आणि इथेच एका फ्रिजरमध्ये ६७ वर्षांच्या मृतदेह आढळून आला.

डॉक्टर सय्यद यांच्यासोबत झालेल्या चाैकशीनंतर मृतदेहाच्या कुटुंबियांना चाैकशीसाठी बोलावण्यात आले आणि मृतदेहाविषयीची चाैकशी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्सोवा निवासी वृद्ध कॅन्सरने आणि किडनी फेलरने पिडित होता. जून २०२२ मध्ये त्याचे निधन झाले. काही दिवस मृतदेहाला घरीच ठेवण्यात आले होते, तथापि, सोसायटीतील लोकांनी विरोध केल्यानंतर मुलांनी या मृतदेहाला मालाडमधील कोंकणीपाडा येथील डे केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. यासाठी डाॅक्टर सय्यद यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सांगितले जात आहे की, वडिलांचा मृतदेह जतन करण्यासाठी डॉ. सय्यद यांना दरमहा १,३०,००० रुपये दिले जात होते. याप्रमाणे गेल्या ४ वर्षात मुलांनी वडिलांच्या मृतदेहाचे जतन करण्यासाठी आतापर्यंत ५० लाखाहून अधिक रुपये खर्च केले.

मृतदेह का ठेवण्यात आला होता

वृद्ध व्यक्तीला दोन मुली आणि एक मुलगा आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलीला एका वैज्ञानिकाने सांगितले की, मेलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत केले जाऊ शकते. फक्त यासाठी त्याच्या शरीराला सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. याला वैज्ञानिक भाषेत क्रायोनिक्स असे म्हटले जाते. अमेरिकेत जगातील ५५० लोकांचे मृतदेह क्रायोनिक्स पद्धतीने ठेवले आहेत. मुलीचे वडिलांशी भावनिक नाते होते ज्यामुळे वडिलांचा मृतदेह जतन करण्यासाठी तिने भारतात राहणारी आपली बहिण आणि भाऊ यांच्यासोबत चर्चा करुन मृतदेहाला फ्रीझरमध्ये ठेवले होते.

अंतिम संस्कार पार पडले

माहितीनुसार, मंगळवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास सुरक्षेच्या व्यवस्थेसह मृतदेहाला फ्रिझरमधून काढून भायखळा येथील मोर्चरी सेंटरमध्ये याला पाठवण्यात आले. इथे कुटुंबियांच्या उपस्थितीत बुधवारी मृतदेहाचे अंतिम संस्कार करण्यात आले. अमेरिकेत राहणाऱ्या मुलीने व्हिडिओ काॅलवरुन अंतिम संस्कार पाहिले. दरम्यान ४ वर्षे मृतदेह सेंटरमध्ये असल्याने आता परिसरात दुर्गंध वास पसरला आहे. स्थानिकांनी या जागेला शवागार घोषित करावे अशी विनंती केली असून रात्रीच्या वेळेत इथून जाताना त्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होते असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: Mumbai malad daycare dead body kept in freezer for 4 years cryonics case nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • crime news
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
1

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
2

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
3

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
4

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.