
जावयाच्या छातीत भाला खुपसून निर्घृण खून; सासरा, सासू, पत्नी आणि दोन मेहुण्यांना जन्मठेपेची शिक्षा
विनोद नाना भगत (वय ४०. रा. चीव्हेवाडी, ता. पुरंदर) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. तर खुनाच्या कारणावरून मयत विनोद भगत यांचा सासरा जयसिंग खंडू चीव्हे, मेहुणा सचिन जयसिंग चीव्हे आणि पांडू जयसिंग चीव्हे, सासू विमल जयसिंग चीव्हे, आणि पत्नी नंदा विनोद भगत यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर चौधरी यांनी विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी ८५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर पुराव्या अभावी लता पांडुरंग चीव्हे हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
यातील मयत विनोद भगत आणि त्याची पत्नी नंदा भगत यांच्यात किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होते. त्यातूनच त्याने पत्नीला गावातच असलेल्या माहेरी पाठवून दिले. त्यानंतर मयत विनोद हा पत्नीला परत आणण्यासाठी वारंवार तिच्या माहेरी जाऊन शिवीगाळ करीत होता. सोमवार २१ जानेवारी २०१८ रोजी मयत विनोद भगत याने सासरच्या दारात जाऊन पत्नीला शिवीगाळ केली होती.
त्याचाच राग मनात धरून त्याच रात्री ११.३० च्या दरम्यान आरोपींनी मयत विनोदच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. रानडुकरे मारण्यासाठी तयार केलेला लोखंडी भाला, लोखंडी सळई, लाकडी काठ्या, कुऱ्हाड घेवून जोरदार हल्ला केला. यामध्ये त्यांच्या छातीत बरसा खुपसण्यात आल्याने त्यांचे फुफुसे फुटले. तसेच डोक्यात, हातावर, पायावर जोरदार प्रहार झाल्याने जागीच मृत्यू झाला. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनाही मारहाण केली. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या पोलीस पथकाने सर्व आरोपींना घटनास्थळीच ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली होती.
दरम्यानच्या काळात पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांची बदली झाल्यानंतर निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांची सासवड पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी घटनेचा तपास करून कोर्टात दोषारोपपत्र सादर केले. तसेच आरोप निश्चित करून २०२४ पासून खटल्यातील साक्षी पुरावे नोंदविण्यास सुरुवात झाली. सरकार पक्षातर्फे ऍड राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली.
गुन्ह्याचे स्वरूप, त्यातील क्रूरता आणि झालेला गंभीर परिणाम लक्षात घेता आरोपींना शिक्षेत सवलत देण्यात येवू नये तसेच गुन्हाचे स्वरूप लक्षात घेवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अॅड. कावेडिया यांनी न्यायालयाकडे केली होती. यामध्ये न्यायालयीन कामकाजात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयसिंग जाधव पैरवी अंमलदार विध्याधर निचित, जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी माधुरी तावरे यांनी सहकार्य केले.
Ans: विनोद नाना भगत (वय ४०, रा. चिव्हेवाडी, ता. पुरंदर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Ans: जिल्हा व सत्र न्यायालयाने सासरे, सासू, पत्नी आणि दोन मेहुणे अशा पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी ८,५०० रुपये दंड ठोठावला आहे.
Ans: पत्नीला सासरी परत आणण्यावरून सुरू असलेल्या वादातून विनोद भगत यांनी सासरच्या दारात जाऊन शिवीगाळ केली होती. याचाच राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या घरात घुसून लोखंडी भाला, सळई, कुऱ्हाड आणि काठ्यांनी हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.