
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
याप्रकरणी जखमी भारत कदम यांचा भाऊ संतोष कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भारत रोज दुचाकीने सांताक्रूझला ऑफिसला जातो. दुपारी सुमारे २ च्या सुमारास तो अंधेरी उड्डाणपुलावर पोहोचला असताना अचानक मांजा त्याच्या गळ्याभोवती अडकला, त्यात तो तो जखमी झाला. त्याने स्वतः फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तो उड्डाणपुलावरून रिक्षाने रुग्णालयात गेला.
थोडक्यात बचावली श्वसननलिका
भारत कदम यांच्या गळ्याला खोल जखम झाली. उपचारासाठी प्लास्टिक सर्जन आणि इतर डॉक्टरांना रुग्णालयात बोलावण्यात आले आहे. जखम श्वसननलिकापर्यंत खोल होती, मात्र सुदैवाने श्वसननलिकाला इजा झालेली नाही. गळ्यात दोन्ही बाजूंना जखमा झाल्या असून, अनेक टाके घालण्यात आले आहेत. भारत कदम यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
तपास सुरु
या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दुचाकी घटनास्थळावरून उचलून अंधेरी वाहतूक चौकीत नेली. खांबात अडकलेला मांजा काढून अंधेरी पोलिसांकडे सुपूर्द केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले.
नायलॉन मांजाने 48 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अंत; रक्ताच्या थारोळ्यात मुलीला केला शेवटचा कॉल, मात्र…
मकर संक्रांतीच्या आनंदाला गालबोट लावणारी एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नायलॉन मांजाने एका व्यक्तीचा जीव घेला आहे. त्या व्यक्तीने रक्ताच्या थारोळ्यात आपल्या मुली सोबत शेवटचे बोलण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. ही घटना कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यात घटना घडली.
Ans: दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती अचानक नायलॉन मांजा अडकला आणि गळा कापला गेला.
Ans: प्रकृती स्थिर असून गळ्याला टाके घालण्यात आले आहेत.
Ans: मांजा जप्त करून तपास सुरू केला आहे.