Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: ऑपरेशनची वाट पाहत होते रुग्ण, डॉक्टर मात्र कॅबिनमध्ये मृतावस्थेत; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू

मुंबई मधील जगजीवन राम रुग्णालय येथे ENT तज्ज्ञ Dr. अनुजा कुलकर्णी यांचा त्यांच्या कॅबिनमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. ऑपरेशनसाठी न आल्याने सहकाऱ्यांनी शोध घेतला असता त्या जमिनीवर मृतावस्थेत आढळल्या.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 14, 2026 | 12:48 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुंबईमधील जगजीवन राम रुग्णालय येथे डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू.
  • ऑपरेशनसाठी न आल्याने सहकाऱ्यांनी कॅबिन तपासले असता मृतदेह आढळला.
  • पोलिसांकडून तपास सुरू; मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
मुंबई: मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्ध ‘जगजीवन राम’ या रुगालयातील डॉक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह आढळलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. अनुजा कुलकर्णी (४४) असे आहे. डॉ. अनुजा कुलकर्णी या एक निष्णात कान-नाक-घसा सर्जन होत्या. त्यांचा मृतदेह त्यांच्याच कार्यालयात (कॅबिनमध्ये) जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे.

Mumbai crime: उंदरांनी खाल्ले मासे, संशय मित्रावर, मित्रांनीच तरुणाची केली हत्या; 50 कचरा वेचकांची चौकशी आणि…

कशी उघडकीस आली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी त्यांच्या काही महत्वाच्या शस्त्रक्रिया नियोजित होत्या. ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्ण आणि कर्मचारी त्यांची वाट पाहत होते. मात्र बराच वेळ झाला तरी डॉक्टर आल्या नाहीत. शस्त्रक्रिया विभागात त्या न पोहोचल्याने सहकारी डॉक्टरांनी त्यांना मोबाईलवर आणि त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथून देखील कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

काहीतरी अघटित घडल्याच्या संशयाने रुग्णालयातील एका कनिष्ठ डॉक्टरने चौथ्या मजल्यावर असलेल्या डॉ. अनुजा यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. तिथे कार्यालयाचे दार आतून बंद होते. अनेकदा दरवाजा ठोठावण्यात आला मात्र आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजाच्या काचेच्या पॅनेलमधून आत डोकावून पहिले तेव्हा डॉ. अनुजा या खुर्चीजवळ जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेल्या दिसल्या. तातडीने दरवाजा तोडून कर्मचारी आणि इतर वरिष्ठ डॉक्टर आत शिरले, मात्र तपासणीअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हृदयविकाराचा झटका की…

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली, नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासणीत पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट किंवा संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे सांगितले आहे. काही रिपोर्ट्सनुसार, हृदयविकाराचा झटका आल्याने आणि वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलिस सखोल तपास करत आहे. डॉ. अनुजा यांचा पार्थिव शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरु

नागपाडा पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली आहे. रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. डॉक्टर अनुजा या अविवाहित होत्या आणि रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या.

Ahilyanagar Crime: बेपत्ता तक्रार देणारा मुलगाच निघाला खुनी, मुलगा-जावयानेच वडिलांची केली हत्या; तपासात धक्कादायक माहिती समोर

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना मुंबईमधील जगजीवन राम रुग्णालय येथे घडली.

  • Que: डॉक्टरांचा मृतदेह कसा सापडला?

    Ans: ऑपरेशनसाठी त्या वेळेत न आल्याने सहकाऱ्यांनी कॅबिन तपासले असता Dr. Anuja Kulkarni जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत आढळल्या.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Web Title: Mumbai news patients awaited surgery but doctor found dead in cabin cctv footage under scrutiny

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.