सौजन्य फोटो - AI Gemini
हेही वाचा: Samruddhi Mahamarg: शासकीय वाहनावर अज्ञातांची दगडफेक; ‘११२’ वर तीन वेळा कॉल करूनही २ तास मदत नाही, सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह!
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरातील एका महत्त्वाच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली आहे. ही बदली प्रशासकीय कारणास्तव झाल्याचे सांगितले जात असले, तरी यामागे संबंधित महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीचा संदर्भ जोडला जात आहे. आदेश बाहेर येताच मंगळवारी ठाण्याच्या परिसरात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
संबंधित महिला कॉन्स्टेबलचा पती पोलीस दलातील बडा अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्याच आधारे ती पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करत असल्याची माहिती समोर येत आहे. ड्युटीदरम्यान कामात चुकारपणा करणे आणि कोणी जाब विचारल्यास किंवा काम सांगितल्यास खोट्या तक्रारी करून बदनामी व मानसिक त्रास देण्याची भीती दाखवली जात असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.
कर्तव्यापेक्षा तिला मॉडेलिंग आणि ग्लॅमरची अधिक ओढ असल्याचीही पोलीस दलात चर्चा आहे. पतीच बडा अधिकारी असल्यामुळे या महिला पोलिसाची तक्रार कुठे करायची, अशी हतबलता काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्याचे बोलले जाते. यापूर्वीही काही अधिकाऱ्यांना अशाच तक्रारींचा सामना करावा लागल्याची उदाहरणे चर्चिली जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित ओळखींचा वापर करून दबाव आणला जात असल्याच्या कुजबुजीनंतर, आता वरिष्ठ पातळीवरून नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: पश्चिम उपनगरातील एका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीनंतर संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबलने ठाण्याच्या परिसरात फटाके फोडून कथित 'ट्रान्सफर सेलिब्रेशन' केल्याची चर्चा रंगली आहे
Ans: पती पोलीस दलातील बडा अधिकारी असल्याचा आणि वरिष्ठांशी ओळखी असल्याचा धाक दाखवून ती दमदाटी करत असल्याचा, कामात चुकारपणा करून काम सांगितल्यास खोट्या तक्रारींची भीती दाखवली जात असल्याचा आरोप सूत्रांकडून केला जात आहे.
Ans: या कथित प्रकारामुळे दलात चर्चा व हतबलतेची भावना निर्माण झाली असून, वरिष्ठ पातळीवरून तिच्या वर्तनावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






