Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: प्रेयसीसाठी पत्नीचा खून! 6.70 लाखांची सुपारी अन्…; पतीच्या भयानक हत्याकांडाचा दीड वर्षांनी थरारक खुलासा

आपल्या प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी एका पतीने स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा कट रचला. 6.70 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीचा खून केला आणि त्यानंतर हा प्रकार आत्महत्येचा वाटावा यासाठी तिचा मृतदेह पंख्याला लटकवला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 25, 2026 | 08:48 PM
प्रेयसीसाठी पत्नीचा खून! 6.70 लाखांची सुपारी अन्...; (Photo Credit- X)

प्रेयसीसाठी पत्नीचा खून! 6.70 लाखांची सुपारी अन्...; (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • प्रेयसीसाठी पत्नीचा खून!
  • 6.70 लाखांची सुपारी अन्…;
  • पतीच्या भयानक हत्याकांडाचा दीड वर्षांनी थरारक खुलासा
Crime News Sakinaka: मुंबईतील साकीनाका परिसरातून एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी एका पतीने स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा कट रचला. 6.70 लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीचा खून केला आणि त्यानंतर हा प्रकार आत्महत्येचा वाटावा यासाठी तिचा मृतदेह पंख्याला लटकवला. सुरुवातीला हा अपघात किंवा आत्महत्या वाटत असतानाच, वडिलांच्या संशायामुळे या प्रकरणाचा दीड वर्षांनंतर छडा लागला असून साकीनाका पोलिसांनी पतीसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

14 ऑक्टोबर 2024 रोजी साकीनाका येथील संघर्ष नगर परिसरात राहणाऱ्या नारंगी उर्फ गीता चौधरी (34) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराच्या किचनमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक पाहणीत पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे गृहीत धरून ‘आकस्मिक मृत्यू’ची (ADR) नोंद केली होती. मुंबईतील शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते.

वडिलांचा संशय अन्…

गीता यांच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी राजस्थानला नेला आणि तिथे दफनविधी उरकला. मात्र, मृत महिलेचे वडील भानाराम चौधरी (66) यांना आपल्या मुलीने आत्महत्या केली असावी यावर विश्वास नव्हता. आपल्या मुलीची हत्या झाली आहे, असा त्यांचा ठाम आरोप होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राजस्थानमध्ये तक्रार दाखल झाली आणि अखेर दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढून राजस्थानमध्येच दुसरे शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालात गीता यांची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे तपासाला वेगळीच कलाटणी मिळाली.

गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ दोघांना न्यायालयाने दिली ‘ही’ मोठी शिक्षा

6.70 लाखांची सुपारी आणि हत्येचा तिसरा प्रयत्न

मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 10चे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती सकाराम चौधरी (36) याने यापूर्वीही दोनदा पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पवईमध्ये रस्ते अपघाताचा बनाव रचला होता, तर दुसऱ्यांदा मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन्ही वेळा तो अपयशी ठरला. अखेर त्याने आपला मित्र शंकर डांगी याला पत्नीच्या हत्येसाठी 6.70 लाख रुपयांची सुपारी दिली.

मुख्य आरोपींची नावे:

  • सकाराम चौधरी (पती आणि मुख्य सूत्रधार)
  • शंकर डांगी (सुपारी घेणारा मित्र)
  • बाबू उर्फ राघव गायरी
  • दिनेश गायरी

असा रचला हत्येचा कट

14 ऑक्टोबर 2024 रोजी सकारामने बाबू आणि दिनेश या आरोपींच्या मदतीने गीता यांची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिचा मृतदेह पंख्याला लटकवला. जर राजस्थानमध्ये पुन्हा शवविच्छेदन झाले नसते, तर हा गुन्हा कधीच उघडकीस आला नसता आणि ही केस कायमची बंद झाली असती.

प्रेयसीसाठी पत्नीचा अडथळा दूर केला

साकीनाका पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि संशयावरून सकारामची कसून चौकशी केली. तीन वेळा चौकशी होऊनही तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, चौथ्यांदा पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तो पुरता कोलमडला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. तपासात समोर आले की, सकारामचे डिंपल चौधरी नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. तिला घरात स्थान देण्यासाठी तो पत्नीचा काटा काढू पाहत होता. सध्या साकीनाका पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रग्ज सिंडिकेट’चा पर्दाफाश! गुजरात कनेक्शन उघड; ४४०० नशा गोळ्यांसह दोघांना बेड्या

Web Title: Mumbai sakinaka husband killed wife for girlfriend contract killing case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • crime news
  • Girl Murder
  • Mumbai

संबंधित बातम्या

चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल
1

चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल

आंघोळ करतानाचे ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर…
2

आंघोळ करतानाचे ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर…

फसवणुकीतील रक्कम अमेरिकेतून परत मिळवली, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांचे यश; उद्योजकाला मिळाले तब्बल…
3

फसवणुकीतील रक्कम अमेरिकेतून परत मिळवली, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांचे यश; उद्योजकाला मिळाले तब्बल…

कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्विय सहाय्यक फरार; शोधासाठी पोलिसांची दोन पथके नियुक्त
4

कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्विय सहाय्यक फरार; शोधासाठी पोलिसांची दोन पथके नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.