
crime (फोटो सौजन्य: social media)
मुंबई: एका महिलेने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी 13 वर्षे नातेसंबंध ठेवले आणि नंतर तिचा तीन वेळा गर्भपात केल्याचा धक्कादायक आरोप कॉर्पोरेट मॅनेजरवर केले होते. मुंबई सत्र न्यायालयाने कॉर्पोरेट मॅनेजरला 30 वर्षीय महिलेनं दाखल केलेल्या खटल्यातून निर्दोष मुक्त केलंय. न्यायालयाने आपल्या निकालात म्हंटले आहे की, हे नातेसंबंध दोघांच्याही संमतीने झाले होते. महिला ही सुशिक्षित होती, तिला आरोपीच्या विवाहित असण्यासह त्याची इतर संपूर्ण परिस्थितीची जाणीव देखील होती. आरोपीने तिच्याशी विवाह न केल्याने महिलेनं रागाच्या भरातच एफआरआय दाखल केला होता असे ही न्यायालयाने म्हंटल आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
२०१४ साली माटुंगा पोलीस ठाण्यात ३० वर्षीय महिलेने एफआयआर दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनुसार, ही घटना 2000 ते 2013 दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणात सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. युक्तिवादात त्यांनी म्हंटले की, आरोपी हा एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता, आरोपीने आजारी असल्याचे भासवून महिलेला त्याच्या घरी नेले आणि नंतर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास सुरवात केली. त्याने त्यामहिलेवर प्रेम असल्याचे सांगत तिला लग्नाचे आश्वासम देत तिच्यावर लैंगिक शोषण केलं.
तीन वेळा गर्भपात
३० वर्षीय महिला ही तीन वेळा गर्भवती राहिली होती. २००१, २०१० आणि २०१२ साली तिन्ही वेळा तिने आरोपीच्या आग्रहावरून गर्भपात केला. याचे पुरावे सरकारी वकिलांनी सादर केले होते. जेव्हा आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा त्यांचे संबंध बिघडले. २०१३ मध्ये आरोपीने महिलेला धमकी देखील देण्यात आली. असे युक्तिवाद सरकारी वकिलांनी केले. युक्तीवादानंतर सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायाधीशांनी असा निर्णय दिला की, सरकारी वकिलांना त्यांचा खटला देखील सिद्ध करण्यास अपयश आलं. त्यांनी आरोपीच्या विवाहाच्या जीवनाबाबत तफावता असल्याचे निदर्शनात आणून देण्यास सांगितली होती.
महिलेने कबूल केलं की, 2001-02 मध्ये आरोपीच्या पत्नीला भेटली होती. याचा अर्थ असा की, जेव्हा तिने पहिल्यांदा आरोपीशी लैंगिक संबंध ठेवले तेव्हा तिला आरोपी हा विवाहित असल्याची पूर्णपणे कल्पना देखील होती. महिलेनं केवळ संबंध चालू ठेवलेच नाहीतर आरोपीच्या मुलाच्या जन्मानंतर कंपनीत मिठाई देखील वाटली होती, हे मान्य केलं होतं. असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
नेमकं काय म्हणाले न्यायाधीश
न्यायाधीश एस. एस. आडकरांनी सांगितलं की, जेव्हा संबंध सुरु झाले होते तेव्हा त्या महिलेचं वय हे सुमारे 30 वर्षे होते. ती एक प्रौढ महिला होती आणि तिच्यासोबत सुरु असलेल्या सर्व गोष्टींची तिला जाणीव देखील झाली होती, त्यामुळे महिलेची फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही. जर तिला खोटी माहिती दिली असती तर, तिने ताबडतोब पोलीसात तक्रार करायला हवी होती, पण तिने तक्रार दाखल केली नाही असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या अशाच काही निर्णयांचा दाखला देताना न्यायाधीशांनी निष्कर्ष काढला की, लग्नाच्या खोट्या आश्वासनाखाली आणि फसवणूक सिद्ध करण्यासाठी कसलीही जबरदस्ती करणे गरजेचं नाही. याच प्रकरणात न्यायाधीश पुढे म्हणाले की, या प्रकरणातील दोघांचे शरीरसंबंध संमतीचेच होते. पीडितेला कोणत्याही प्रकारे जबरदस्ती, दिशाभूल किंवा चुकीची माहिती देण्यात आली नव्हती. तिने जे काही केलं ते तिने स्वत:च्या मर्जीनेच केलं आहे.
Ans: नाते हे सहमतीने होते आणि महिलेला आरोपी विवाहित असल्याची जाणीव होती; फसवणुकीचे ठोस पुरावे नव्हते.
Ans: लग्नाचे खोटे आमिष, 13 वर्षांचे नाते, आणि तीन गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप.
Ans: ती सुशिक्षित, प्रौढ असून परिस्थितीची पूर्ण जाणीव होती; त्यामुळे फसवणूक सिद्ध होत नाही असे नमूद केले.