
Murder Case News: "आई रक्ताच्या थारोळ्यात अन् वडील गायब..." सकाळी मुलीने दरवाजा उघडताच उघडकीस आला भयानक प्रकार!
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश जोंधळे असे आरोपी पतीचे नाव असून, शारदा जोंधळे असे हत्या झालेल्या दुर्दैवी पत्नीचे नाव आहे. दिनेश हा दारूच्या आहारी गेला होता आणि सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घालायचा. शनिवारी रात्री हे दाम्पत्य घरातील खोलीत झोपायला गेले होते. दरम्यान, पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास संशयाचे भूत डोक्यात घुसलेल्या दिनेशने घरातील कुऱ्हाड आणून झोपेत असलेल्या शारदा यांच्या मानेवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, शारदा यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. कृत्य केल्यानंतर आरोपी दिनेश घटनास्थळावरून फरार झाला.
या दाम्पत्याला तीन मुले असून दोन मुलींचा विवाह झाला आहे, तर १५ वर्षांचा मुलगा शिक्षण घेत आहे. दिनेशचे वृद्ध आई-वडील समोरील छोट्या घरात स्वतंत्र राहतात. घटनेच्या रात्री मुलगा आणि मुलगी तिथे झोपण्यासाठी गेले होते. सकाळी नेहमीप्रमाणे आई-वडील उठले नाहीत म्हणून मुलगी त्यांना पाहण्यासाठी मुख्य घरात गेली. तिने सुरुवातीला बाहेरून आवाज दिला, मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने दरवाजा लोटला. दरवाजा उघडाच असल्याने आत जाऊन पाहताच तिला आई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली दिसली, तर वडील घरातून गायब होते. हा थरारक प्रकार पाहून मुलीने मोठा आक्रोश केला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर, हवालदार रतन बावस्कर, कर्मचारी अमोल पाटील, विनोद दामोदर आणि सलीम शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी दिनेश जोंधळे याचा माग काढत त्याला मालेगाव शहरातून ताब्यात घेतले व त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास जऊळका पोलीस करत आहेत.
Ans: ही घटना वाशीम जिल्ह्यातील जऊळका येथे घडली असून मृत महिलेचे नाव शारदा जोंधळे असे आहे.
Ans: आरोपी पती दिनेश जोंधळे हा व्यसनाधीन होता आणि तो सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, याच संशयातून त्याने कुऱ्हाडीने वार करून ही हत्या केली.
Ans: हत्येनंतर पसार झालेल्या आरोपी दिनेश जोंधळे याला जऊळका पोलीस ठाण्याच्या पथकाने मालेगाव शहरातून शोधून अटक केली.