
Washim Pending Farmer Loan Waiver
निवेदनानुसार, तिन्ही शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीत समाविष्ट झाली आहेत. तसेच ज्ञानेश्वर सरनाईक यांनी २७ जुलै, गजानन लोखंडे यांनी २८ जुलै, तर शामसुंदर खोटे यांनी २९ जुलै केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. असे असतानाही संबंधित बँकेकडून त्वं कर्ज खात् येना अद्याप कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी अनेकदा मसलापेन येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांची भेट घेऊन विचारणा केली. मात्र, कर्जमाफी अद्याप का झाली नाही, याबाबत कोणतीही
जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करण्याचा सत्लाही बँकेकडून देण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे. आधीच अपुऱ्या पावसामुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून कर्जमाफी मंजूर होऊनही प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने नव्याने पीककर्ज घेण्याचा मार्गही अडल्याची व्यथा वा शेतकऱ्यांनी मांडली आहे. शासनाच्या योजनेत पात्र ठरूनही बँकेच्या स्तरावर लाभ रखडत असल्याने आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे संबंधित बँकेला तातडीने आवश्यक आदेश देऊन इतर पात्र शेतकऱ्यांप्रमाणे आपलीही कर्जमाफी मंजूर करावी आणि प्रलंबित लाभ तत्काळ खात्यात जमा करावा, अशी मागणी तिन्ही शेतक-यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अतिवृष्टी व पिकाच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून जाहीर झालेली ५ हजार रुपयाची मदत अत्यंत तुटपुंजी आहे, ही मदत अपूर्ण असून शेतकऱ्यांना सरसकट एक लाखाची आर्थिक मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या मागणीसाठी येत्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता मगरुळपीर तालुक्यातील वनोजा शेलु बाजार येथे समुद्री महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्याचे आंदोलन असल्याने ऐतिहासिक राहील अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पश्चिम विदर्भ संपर्क नेते खा. अरविंद सावंत, वाशिम यवतमाळ लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि शिवसेना उपनेते आ. नितीन बापू देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असून या आंदोलनामध्ये शासनाने ५ हजार रुपयाची तोकडी मदत घोषीत केली याचा निषेध केला जाणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट एक लाखाची मदत सरकारने दिली पाहिजे, अशा प्रकारची प्रमुख मागणी या आंदोलनात केली जाणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे यांनी दिली आहे.