
crime (फोटो सौजन्य: social media)
या प्रकरणातील मृतकाचे विशाल जगन रंदई (37) असे आहे. निलेश अरुण ढोणे (35) असे आरोपीचे नाव आहे. आपल्या पत्नीशी अंदाजे दोन वर्षांपासून विशालचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा गावात होती. निलेशला संशय देखील होता. पत्नीच्या वागणुकीबद्दल त्याला काही दिवसांपासून संशय होता. या कारणी दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. संशयाची खात्री झाल्यानंतर आरोपी निलेश अरुण ढोणे याने मृतक विशाल रंदईला गावातीलच एका एकांत ठिकाणी बोलावले. त्या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा होऊन वाद झाला. आणि याच वादच रूपांतर हत्येत झाला. आरोपीने लाकडी दांड्याने विशालवर वार केले त्यामध्ये गंभीर जखमी झालेला रंदई रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी निलेश अरुण ढोणेला (35) अटक केली आहे. तपास घाटंजी पोलीस ठाण्यातील अधिकारी करीत आहे.
भांडण सोडवण्यासाठी गेला अन् ब्लेडने हल्ला झाला; गंभीर जखमी तरुणाला तातडीने नेले रुग्णालयात
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मजुरावर दारुच्या नशेत असलेल्या एकाने ऑपरेशन ब्लेडने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना हसूल परिसरातील जहांगीर कॉलनीत घडली.
अमित अदमाने (वय २०, रा. जहांगीर कॉलनी, हर्सल) असे ब्लेडने हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सय्यद शहारुख सय्यद जाहेद (वय ३६, रा. जहांगीर कॉलनी, हसुल) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २ डिसेंबर रोजी दुपारी फिर्यादीच्या घरासमोर पापासेठ या व्यक्तीस आरोपी अमित अदमाने हा दारूच्या नशेत उभा राहून शिवीगाळ करीत होता. हा प्रकार पाहून फिर्यादी शाहरुख हे भांडण सोडवण्यासाठी गेले. मात्र, किरकोळ कारणावरून आरोपी संतापला आणि त्याने फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
याच भांडणादरम्यान आरोपी अमित अदमानेने आपल्या जवळील ऑपरेशन ब्लेडने फिर्यादीच्या पाठीवर, डाव्या बाजूला वार केला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. याप्रकरणात हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Accident News: तिरुपतीवरून येताना दांपत्यावर काळाचा घाला; ट्रकने अचानक ब्रेक दाबला अन् कार…
Ans: यवतमाळ जिल्ह्यातील पांढुर्णा (खु) येथे.
Ans: पत्नीचे मृतकाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून.
Ans: आरोपी पती अटकेत असून पोलीस तपास सुरू आहे.