
आईच्या निधनानंतर बापच बनला हैवान; दीड वर्षापासून लेकीवर लैंगिक अत्याचार, अखेर पाप उघडकीस'
आरोपी बापाला अटक
बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना मुजफ्फरपुर जिल्ह्यातील सरैया पोलिस ठाण्याच्या परिसरात घडून आली आहे. या प्रकरणात मुलीने वडिलांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पिडितेच्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली असून आरोपी वडिलांना अटक केली आहे.
७ वर्षांआधी आईचे झाले निधन
पिडितेने पोलिसांना सांगितले की, तिच्या आईचे २०१९ साली निधन झाले होते. तिला दोन लहान भाऊ आहेत. आरोप आहे की, साधारण दीड वर्षांपासून तिचे वडिल तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत आहेत. मुलीने विरोध केला की, तिला मारहाण केली जाते आणि वडिल तिला जीवे मारण्याचीही धमकी देतात.
नातेवाईकांना सांगितली वडिलांची हैवानियत
पिडितेने पोलिसांना सांगितले की, १७ ऑगस्ट रोजी तिने आपल्या नातेवाईकांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली. नातेवाईकांना यासंबंधात तिच्या वडिलांना जाब विचारला. यावर आरोपी भडकला आणि त्याने विळा तसेच तलवाराच्या मदतीने नातेवाईकांवर हल्ला चढवला.
Pune Accident : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…
यानंतर शुक्रवारी आरोपीने आपल्या मुलीसोबत पुन्हा एकदा जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुलीने हिम्मत केली आणि पोलिस ठाण्यात जाऊन वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस लगोलग घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी वडिलांना आपल्या ताब्यात घेतले. शनिवारी आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले.