Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे सख्खे भाऊ अखेर जाळ्यात! गुन्हे शाखेची मोठी कारवाई

सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या दोन सख्ख्ये भाऊ असलेल्या अट्टल गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने शिताफीने जेरबंद केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2026 | 12:30 AM
दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे सख्खे भाऊ अखेर जाळ्यात! गुन्हे शाखेची मोठी कारवाई

दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे सख्खे भाऊ अखेर जाळ्यात! गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • दीड वर्षांपासून फरार झालेले सख्खे भाऊ अखेर जेरबंद!
  • नोकरी करून पोलिसांना दिला होता चकवा
  • पुणे गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई
पुणे : सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या दोन सख्ख्ये भाऊ असलेल्या अट्टल गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने शिताफीने जेरबंद केले आहे. सागर शैलेश गायकवाड (वय २५) आणि आकाश शैलेश गायकवाड (वय २६, दोन्ही रा. पुणे) अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, हे दोघेही पोलिसांच्या नजरेपासून लपण्यासाठी सुसगाव येथील एका ओल्डएज होममध्ये आणि कात्रज-कोंढवा परिसरातील एका जिममध्ये नोकरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

 

पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर पिंगळे, अमित गद्रे, परमेश्वर नरवडे, साईकुमार कारके, साधना पवार आणि अजित शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सहकारनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२)(३)) हे दोन्ही आरोपी मागील दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होते. रेकॉर्डवरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. यादरम्यान, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर पिंगळे यांना आरोपी सागर गायकवाड हा सुसगावमधील पायगुडेनगर येथील ‘श्री. माऊली ओल्डएज होम’मध्ये नोकरी करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तर दुसरा आरोपी आकाश गायकवाड हा टिळेकर नगरमधील ‘वर्ल्ड फिटनेस जिम’मध्ये कामास असल्याची कुणकुण पोलिस अंमलदार अमित गद्रे यांना मिळाली.

हे सुद्धा वाचा : लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…; सपकाळांची मागणी

पोलिसांचा यशस्वी सापळा

माहितीनंतर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पथकाने सुसगाव आणि कात्रज-कोंढवा परिसरात एकाच वेळी सापळा रचला. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून दोन्ही आरोपींना अत्यंत फिल्मी स्टाइलने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फरार आरोपींची नावे काय आहेत?

    Ans: सागर शैलेश गायकवाड (वय २५) आणि आकाश शैलेश गायकवाड (वय २६).

  • Que: आरोपी कुठे नोकरी करत होते?

    Ans: पोलिसांपासून लपण्यासाठी एक आरोपी सुसगाव येथील वृद्धाश्रमात, तर दुसरा कात्रज-कोंढवा परिसरातील जिममध्ये नोकरी करत होता, अशी माहिती तपासात समोर आली.

  • Que: आरोपींना कोणी अटक केली?

    Ans: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने दोघांना जेरबंद केले.

Web Title: The police have arrested two criminals who were on the run nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

छळामुळे विवाहितांच्या आत्महत्येच्या दोन घटना, पुण्यात खळबळ; दोन्ही पतींना अटक
1

छळामुळे विवाहितांच्या आत्महत्येच्या दोन घटना, पुण्यात खळबळ; दोन्ही पतींना अटक

पाच वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर फरार आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
2

पाच वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर फरार आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच
3

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती
4

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.