Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख; कॅफेत नेऊन अत्याचार केल्याचा आरोप, धमकीनंतर गरोदरपणाची तपासणी करण्यासाठी दबाव

मैत्रिणीच्या माध्यमातून झालेली ओळख, त्यानंतर कॅफेत नेऊन अत्याचार आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी... तब्बल महिनाभर पीडित मुलगी गप्प राहिली. मात्र, ४ ऑक्टोबरला आरोपीने तिच्या घरी जाऊन पुन्हा दबाव टाकल्यानंतर अखेर धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 07, 2026 | 11:00 AM
मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख; कॅफेत नेऊन अत्याचार केल्याचा आरोप, धमकीनंतर गरोदरपणाची तपासणी करण्यासाठी दबाव

मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख; कॅफेत नेऊन अत्याचार केल्याचा आरोप, धमकीनंतर गरोदरपणाची तपासणी करण्यासाठी दबाव

Follow Us
Follow Us:
  • १७ वर्षीय मुलीवर कॅफेत लैंगिक अत्याचार; २० वर्षीय तरुणाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा
  • अत्याचारानंतर धमकी; प्रेग्नन्सी किटने तपासणी करण्यासाठी मुलीवर दबाव
  • आरोपी फरार; ‘एफ झोन’ कॅफे चालकाची पोलिसांकडून चौकशी

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मैत्रिणीच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत २० वर्षीय तरुणाने मुलीला कॅफेमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर कुणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

कॅफेत अत्याचार केल्याचा आरोप

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्करदरा परिसरातील रहिवासी आरोपी समीर शेख (२०) याची पीडित मुलीशी तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झाली होती. २९ जुलै २०२६ रोजी आरोपीने पीडितेला नंदनवन परिसरातील ‘एफ झोन’ कॅफेत नेले. तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची तसेच गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: घाटातील त्या वळणावर अचानक बस पलटी; गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू

धमकीमुळे महिनाभर गप्प

धमकीमुळे घाबरलेली पीडिता काही काळ शांत राहिली. मात्र, ४ ऑक्टोबर रोजी आरोपीने तिच्या घरी जाऊन तिच्यावर प्रेग्नन्सी किटद्वारे तपासणी करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर पीडितेने धाडस करून आपल्या वडिलांना संपूर्ण घटना सांगितली.

कुटुंबीयांची पोलिसांत धाव

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी सामाजिक संस्थेच्या मदतीने नंदनवन पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी समीर शेख याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत.

आरोपीचा शोध; कॅफे चालकाची चौकशी

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी समीर शेख फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, ज्या ‘एफ झोन’ कॅफेमध्ये घटना घडल्याचा आरोप आहे, त्या कॅफेच्या चालकाचीही चौकशी करण्यात येत आहे. कॅफेमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना अशा प्रकारे खासगी जागा उपलब्ध करून दिली जात होती का आणि या प्रकरणात कॅफे चालकाची काही भूमिका आहे का, याचाही तपास केला जात आहे.

Web Title: Nagpur 17 year old girl sexual assault pocso case nandanvan police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • a minor girl
  • Nagpur Crime News
  • Sexual Assault Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.