सौजन्य फोटो - सोशल मिडीया
या दुर्दैवी अपघातात उत्तम त्रिंबक करंडे (वय ७५), चंद्रकला उत्तम करंडे (वय ७०), गोविंद उत्तम करंडे (वय ४७), ज्योती गोविंद करंडे (वय ४२), गायत्री गोविंद करंडे (वय १६) आणि सिद्धी गोविंद करंडे (वय १५) या ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत गायत्री ही पुण्यात शिक्षण घेत होती. दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी ती अलीकडेच येडशीतील आपल्या घरी आली होती. मात्र, ही दिवाळी तिची अखेरची दिवाळी ठरली.
करंडे कुटुंबाने सध्या राहत असलेल्या जुन्या घराच्या पाठीमागेच एक नवीन सुंदर घर बांधायला घेतले होते. या नव्या घराचे काम अगदी अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे कुटुंब तिथे राहायला जाणार होते. मात्र, नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झेप घेतली. पहाटे अडीच वाजता आग लागल्याचे समजताच गावकऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. बोअरवेल सुरू करून, बादल्यांनी पाणी मारून तसेच थेट जेसीबीच्या साहाय्याने घराची मागची भिंत फोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीचा भडका आणि धूर इतका तीव्र होता की आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि तोपर्यंत सर्वांचा प्राण गेला होता.
ही आग इतकी भीषण होती की घरासमोर असलेले उंच पिंपळाचे झाड खोडापासून शेंड्यापर्यंत पूर्णपणे करपून गेले, तर नारळाचे झाडही जळून खाक झाले. “आम्ही कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, भिंती फोडल्या पण आग प्रचंड होती. माणसं देवासारखी चांगली होती, त्यांना वाचवता आले नाही याचे मोठे दुःख आहे,” अशा भावना प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले असून, आगीचे नेमके कारण काय होते याचा अधिक तपास सुरू आहे.
Ans: ही घटना धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात घडली.
Ans: या घटनेत एकाच करंडे कुटुंबातील ६ जणांचा (तीन पिढ्यांचा) मृत्यू झाला आहे.
Ans: गावकऱ्यांनी बोअरवेलचे पाणी मारून, घरावर चढून आणि जेसीबीने मागची भिंत फोडून कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला.






