लोखंडी रोडने केला हल्ला!
आकाश मंडल हा तरुण घरातील मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तो सतत घराच्या समोरून चकरा मारत असायचा. ही गोष्ट जेव्हा मुलीने वडिलांना सांगितली तेव्हा त्या नंतर पंकज ठाकूर याने मुलाला जाब विचारला. मला का विचारलं म्हणून त्याला राग अनावर झाला आणि त्या नंतर त्याने दोन जणांना बोलवून घेतल आणि झालेल्या वादात पंकजचा मृत्यू झाला आहे. आकाश मंडल हा मुलीचा पाठलाग करत होता. त्यासाठी त्याला विचारण्यात आल की तू हे का करतोस तेव्हा त्याने थेट वाद घातला आणि रागाचा भरात पंकजचा खून केला.
सीवीटीव्ही तपासून आरोपीचा शोध
या घटनेतील आरोपी हा आकाश मंडल याचा सीसीटीव्ही तपासून शोध घेतला जात आहे. पोलीस याचा शोध घेत आहेत.पंकजचा खून झाल्या नंतर मातोश्री परिसरात गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झाल होत. आता या घटनेतील आरोपीचा शोध सध्या घेतला जात आहे. घरासमोर चक्कर का मारली आणि हे विचारलं असता थेट खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Solapur Accident: झोपेची पेंग महागात! कार थेट कालव्यात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, तर…
Ans: मुलीचा पाठलाग करणाऱ्याला जाब विचारल्यामुळे वाद होऊन हत्या झाली.
Ans: SRPF कर्मचारी पंकज ठाकूर.
Ans: CCTV फुटेज तपासून आरोपीचा शोध घेत आहेत.






