Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा चाकूने सपासप वार

नागपूरमध्ये ब्लिंकइटच्या 34 वर्षीय डिलिव्हरी बॉय आमीन मुस्तफा पठाण याच्यावर त्याच्याच दोन सहकाऱ्यांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला. चांगल्या कामगिरीमुळे निर्माण झालेल्या मत्सरातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय आहे. जखमी आमीनवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 04, 2026 | 12:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांनी चाकूने हल्ला केला.
  • जखमी आमीन पठाणवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू केला आहे.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक आणि घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयला वेळेत डिलिव्हरी करण महागात पडलं आहे. त्याच्याच सहकर्मचाऱ्याने मत्सरातून चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसटी महामंडळ क्वार्टरसमोर उशिरा रात्री ही भीषण घटना घडली.

काय घडलं नेमकं?

हत्या झालेल्या तरुणाचे नाव आमीन मुस्तफा पठाण (३४ वर्ष) असे आहे. तो ऊंटखाना भागात राहतो. आमीन हा ब्लिंकइट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो प्रत्येक ऑर्डर वेळेत पूर्ण करत असल्यामुळे कंपनीत त्याची वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून त्याच्यासोबतच काम करणारे 20 वर्षीय केतन उरकुडे आणि 20 वर्षीय श्रवण बारई हे दोघे त्याच्याशी सतत वाद घालत होते.

२ ऑगस्ट, रविवारी सकाळी दोन्ही आरोपींनी आमीनसोबत वाद घालून त्याला जीवे मारण्याची उघड धमकी दिली होती. मात्र त्याच रात्री आमिं जेव्हा मॉडेल मिल चौकात डिलिव्हरी देऊन कंपनीत परतत होता. तेव्हा दोन्ही आरोपींनी त्याचा पाठलाग केला. एसटी महामंडळाच्या क्वार्टरजवळ पोहोचताच आरोपींनी त्याची बाईक अडवली आणि काही समजण्याच्या आतच त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात आमीन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

बावधन पोलिसांकडून वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींसह विधिसंघर्षित बालक ताब्यात; तब्बल ‘इतक्या’ दुचाकी जप्त

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. हल्ला केल्यांनतर आरोपी तिथून पसार झाले. उपस्थित स्थानिक नागरिकांनी तात्काळ पुढाकार घेत जखमी आमीनला शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस हत्येच्या प्रयत्नांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने आपले सूत्रे हलवून अवघ्या काही तासातच केतन केतन उरकुडे आणि श्रवण बारई या दोन्ही आरोपींना अटक केली. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

कन्हान नदीत महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? बेपत्ता मोबाईलमुळे वाढलं गूढ

नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात आढळून आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

पत्नीची हत्या करून मागितली मदत; मित्राने 112 वर काॅल करत पोलिसांसमोर उघड केला संपूर्ण हत्येचा कट

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्यात जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव काय?

    Ans: आमीन मुस्तफा पठाण.

  • Que: हल्ल्यामागील प्राथमिक कारण काय मानले जात आहे?

    Ans: चांगल्या कामगिरीमुळे निर्माण झालेला मत्सर.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Nagpur crime delivering on time cost money delivery boy stabbed by colleagues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

धक्कादायक ! मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; इतर प्रवासी झोपेत असताना ‘तो’ जवळ आला अन्…
2

धक्कादायक ! मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; इतर प्रवासी झोपेत असताना ‘तो’ जवळ आला अन्…

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली
4

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.