(फोटो सौजन्य: Pinterest)
मित्राच्या माहितीवरुन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पत्नीच्या मृतदेहासह आरोपीला अटक केली. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं असून संबंधित आरोपीची कसून चाैकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी किशनगड पोलीस ठाण्याला पीसीआरद्वारे माहिती मिळाली की, एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली असून मृतदेहाच्या बंदोबस्तीसाठी तो मित्राची मदत घेत आहे. माहिती मिळताच पोलिस सतर्क झाले आणि तत्काळ घटनास्थळी दाखल होण्याचा निर्णय घेतला. तक्रारदाराच्या माहितीच्या आधारे आरोपी अनुराग उर्फ अभिषेक (२४) याला अटक करण्यात आली आहे.
चाैकशीत समोर आलं की, आरोपीने घटनेच्या एक दिवसाआधी १ ऑगस्टच्या रात्री आपल्या मित्राला घरी बोलावून घेतले. मित्र जेव्हा घरी पोहचला तेव्हा त्याने आरोपीने त्याला पत्नी कनिकचे मृतदेह बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दाखवले, तिच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या. आरोपानुसार, अनुरागने त्याचवेळी मित्रासमोर पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले. मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी मदद हवी आहे असेही त्याने यावेळी स्पष्ट केले. तथापि, मित्राने यात सामंजस्य दाखवत वेळीच याची माहिती पोलिसांनी देण्याचा निर्णय घेतला. त्याने एक बहाणा करून आरोपीकडून आपला मोबाईल फोन परत मिळवला आणि घटनास्थळावरून निघून गेल्यावर, घटनेची माहिती पोलिसांना देण्यासाठी तात्काळ ११२ वर फोन केला.
पुण्यात घरात घुसून पिता-पुत्रावर चाकूने हल्ला, कानाजवळ अन् दंडावर सपासप वार; कारण काय तर…
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. यानंतर मृतदेहाला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर पत्नीला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ सील करुन क्राईम टीम आणि फाॅरेंसिक लॅब टीमने घटनास्थळावरुन सर्व पुरावे गोळा केले. पोलिस सध्या घटनेचा सखोल तपास करत असून हत्येमागचे नेमके कारण काय हे समजून घेण्याचे काम पोलिस करत आहेत.






