Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; इतर प्रवासी झोपेत असताना ‘तो’ जवळ आला अन्…

बस निर्जन परिसरातून जात असताना वाहक तिच्या आसपास घुटमळत होता. त्याने तरुणीशी अश्लील संभाषण सुरू करून आक्षेपार्ह वर्तन करण्यास सुरूवात केली. या प्रकारामुळे तरुणी घाबरली. मात्र, तिने धैर्याने त्याला विरोध केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2026 | 09:56 AM
मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; खासगी बसच्या वाहकाने घेतला एकटेपणाचा फायदा

मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; खासगी बसच्या वाहकाने घेतला एकटेपणाचा फायदा

Follow Us
Follow Us:

नागपूर : कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी जात असलेल्या तरुणीशी खासगी ट्रॅव्हल्स बसच्या वाहकाने अश्लील चाळे केले. मध्यरात्री बसमधील बहुतांश प्रवासी झोपलेले असताना तिच्या एकटेपणाचा फायदा घेत अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड करून प्रतिकार केल्याने वाहक घाबरला आणि पुढील अनर्थ टळला. ही संतापजनक घटना विजयंत ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षीय तरुणी मूळची मध्यप्रदेशातील मंडला येथील असून, नागपुरातील एका कुटुंबाकडे घरकाम करते. अधूनमधून ती कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी जाते. ७ सप्टेंबर रोजी गावी जाण्यासाठी ती एमपी बसस्थानकावर पोहोचली. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ती विजयंत ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये (एमएच-४०/ए.के.-६६९९) बसली. बस पुढील प्रवासाला निघाल्यानंतर मध्यरात्रीनंतर बहुतांश प्रवासी झोपी गेले.

बस निर्जन परिसरातून जात असताना वाहक तिच्या आसपास घुटमळत होता. त्याने तरुणीशी अश्लील संभाषण सुरू करून आक्षेपार्ह वर्तन करण्यास सुरूवात केली. या प्रकारामुळे तरुणी घाबरली. मात्र, तिने धैर्याने त्याला विरोध केला.

तिकीट, कर्मचाऱ्यांच्या नोंदी तपासल्या

संशयित वाहकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून बसचे तिकीट बुकिंग, कर्मचारी आणि प्रवासाशी संबंधित नोंदी तपासल्या जात आहेत. घटनेच्या वेळी बसमध्ये कोणकोणते कर्मचारी उपस्थित होते, याचीही माहिती घेतली जात आहे.

दिल्लीच्या घटनेनंतरही प्रश्न कायम

२०१२ मध्ये दिल्लीतील धावत्या बसमध्ये घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देशभर ऐरणीवर आला. बसमध्ये चालक वाहकांसह कर्मचाऱ्यांची पडताळणी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि तक्रारींची तातडीने दखल यावर भर देण्यात आला. नागपुरातील ताज्या घटनेमुळे रात्रीच्या बसप्रवासात महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या पाच आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Thane Crime : ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…

Web Title: Attempted assault on young woman in bus at midnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Abused Case
  • crime news
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी अपडेट; एक-दोन नव्हेतर तब्बल 80 साक्षीदारांचे नोंदवले जबाब, 5053 पानांचे आरोपपत्र
1

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी अपडेट; एक-दोन नव्हेतर तब्बल 80 साक्षीदारांचे नोंदवले जबाब, 5053 पानांचे आरोपपत्र

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
2

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

शिरुर हादरलं ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर गोळीबार; लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण, अखेर मृत्यू
3

शिरुर हादरलं ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर गोळीबार; लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण, अखेर मृत्यू

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार
4

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.