
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
मृतकाचे नाव बालाजी कल्याणे (वय २४, मुदखेड, नांदेड) असे आहे. तर आरोपी प्रेयसीचे नाव रती साहेबराव देशमुख (२५, करंजी, नांदेड) असे आहे. बालाजी हा नंदनवन कॉलोनीत भाड्याने खोलीत राहत होता. त्या खोलीत बालाजीचा संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आला होता. तर तेथेच त्याची प्रेयसी देखील रक्तबंबाळ अवस्थेत आढळली होती. त्यामुळे हा हत्येचा प्रकार आहे की आत्महत्या, या संधार्बत पोलिसांनी सखोल तपास सुरु केला. तेव्हा धक्कदायक खुलासा समोर आले.
लग्नाला विरोध म्हणून…
मिळालेल्या माहितीनुसार बालाजी आणि राती यांचे चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. त्यांचा लग्न करण्याचा विचार होता. रती अनेकदा त्याच्या खोलीत जात होती. बुधवारी रात्री ती बालाजीकडे गेली. रतीच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे गुरुवारी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांचा वाद झाला. रतीने तेथील चाकू उचलून बालाजीच्या अंगावर वार केले. हा वार इतका जोरदार होता की बालाजी जागेवरच कोसळला. त्याला त्या अवस्थेत पाहून ती घाबरली व तिने देखील स्वतःवर वार करून घेतले.
गुन्हा दाखल
आरोपी रतीने आधी बाळाजीनेच तिच्यावर हल्ला केला व नंतर स्वतःला मारून घेतल्याची बतावणी केली. मात्र बालाजीच्या अंगावर खोलवर घाव होते त्यातून पोलिसांचा संशय बळावला. तिची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. आरोपी रतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. बालाजीचा भाऊ शिवाजी ऊर्फ ऋषीकेश विनायकराव कल्याणे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. उपचारानंतर सविस्तर कारवाई करण्यात येईल.
एक दिवस आधी अल्टिमेटम
मृतक बाळाजीने या घटनेच्या एका दिवसाआधी अल्टिमेटम दिल्याची माहिती समोर आली आहे. जर लग्न झाले नाही तर माझ्या मरणासाठीच तुम्हाला नागपूरला यावे लागेल असे त्याने रतीच्या वडिलांना त्याने म्हटलं होतं असे बालाजीच्या मोबाईलच्या तपासणीत समोर आले. एवढेच नाही तर रतीने तिचा मोबाईल फॉर्मेट केल्याची माहिती समोर आली आहे.
Navi Mumbai: फेसबुकवरून संपर्कात, कोट्यवधी रूपयांचा लोभ अन् तब्बल ₹56.27 लाखांची फसवणूक
Ans: तपासात प्रेयसी रती देशमुखवर प्रियकर बालाजीची हत्या केल्याचा आरोप स्पष्ट.
Ans: लग्नास कुटुंबीयांचा विरोध, त्यातून निर्माण झालेला वाद.
Ans: अंदाजे चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते.