कशी झाली फसवणूक, काय घडलं नेमकं?
समोर आलेल्या माहितीनुसार, सुरज यादव यांच्याशी ‘आरोही मिश्रा’ नावाच्या महिला प्रोफाइलमधून फेसबुकवर संपर्क साधण्यात आला. तिने फॉरेक्स ट्रेडिंगद्वारे जलद आणि भरघोस नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यांनतर सुरुवातीला इंग्लिश संभाषण, हाय-प्रोफाईल भाषा शैली, आर्थिक तज्ज्ञ असल्याचा आव आणून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला.
विश्वास बसताच त्यांना एका व्हॉट्सअॅप गुंतवणूक ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये ‘रमेश शर्मा’ नावाच्या व्यक्तीद्वारे गुतवणुकीसाठी विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले गेले. सुरुवातीच्या टप्प्यात काही व्यवहारांमध्ये कृत्रिमरीत्या नफा दाखवून फिर्यादींचा पूर्ण विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या निर्देशांनुसार टप्प्याटप्प्याने अनेक वेळा रक्कम जमा केली. अखेरीस एकूण ₹56.27 लाख इतकी रक्कम गुंतवणुकीच्या नावाखाली ट्रान्सफर करण्यात आली.
फिर्यादींना mingcoin-cloud या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावाने तब्बल ₹21.17 कोटी शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले.मात्र, फिर्यादींनी ही शिल्लक रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक वेळी नवीन कारण देऊन व्यवहार नाकारण्यात आला. बराच प्रयत्न करूनही पैसे न मिळाल्याने आणि वेबसाइटवरील हालचाल संशयास्पद असल्याने हे संपूर्ण व्यवहार फसवणुकीचे असल्याचे स्पष्ट झाले.
गुन्हा दाखल?
फसवणूक झाल्यानंतर तातडीने पीडित सुरज यवाद यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या गुन्ह्याचा तपास पोलीस करत असून नवी मुंबईमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढत असल्याने नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या गुंतवणूक प्रस्तावांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणताही संशयास्पद व्यवहार, गुंतवणूक लिंक किंवा आर्थिक फसवणूक आढळल्यास सायबर हेल्पलाइन 112 किंवा नवी मुंबई नेरुळ सायबर पोलीस ठाण्यात तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
Ans: फेसबुकवर संपर्क, फॉरेक्समध्ये मोठ्या नफ्याचे प्रलोभन, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडून बनावट नफा दाखवून पैसे जमा करून घेतले.
Ans: पीडित सुरज यादव यांच्याकडून एकूण ₹56.27 लाखांची फसवणूक झाली.
Ans: नवी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन.






