Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: उधारीचं बिल मागितल्याचा राग! अडीच मिनिटांत गुंडांनी उर्वशी बार फोडला; CCTVत थरार कैद

नागपूरच्या प्रतापनगर परिसरातील उर्वशी बारमध्ये उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून स्थानिक गुंडांनी थरार माजवला. धारदार शस्त्रे व रॉडने अवघ्या अडीच मिनिटांत बार उद्ध्वस्त केला. CCTVत संपूर्ण प्रकार कैद; पोलिस तपास सुरू आह

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 13, 2025 | 08:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रतापनगरमधील उर्वशी बारमध्ये हल्ला
  • उधारीचं बिल मागितल्याचा राग कारणीभूत
  • धारदार शस्त्रे, रॉड, काठ्यांचा वापर
नागपुर: नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही गुंडांनी नागपुरातील उर्वशी बार उद्ध्वस्त केल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुंडांनी धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड आणि लाठ्या, काठ्या घेऊन उर्वशी बारमध्ये हल्ला चढवला. त्यानंतर बारच्या आतील काचा, काउंटरवर ठेवलेल्या बाटल्या तोडण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने बारमध्ये पळापळ सुरु झाली होती. ग्राहक बारमधून पळून गेल्यावर या गुंडांनी बारचा मॅनेजर आणि अन्य कर्मचाऱ्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. ही घटना प्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत उर्वशी बारमध्ये गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता घडली.

खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…

का केली तोडफोड ?

स्थानिय गुंडांनी दोन दिवसांपूर्वी या बारमध्ये मद्य प्राशन आणि जेवण केले होते. मात्र बिल न देता वाद घातला होता. त्यावेळी, हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना खूप सुनावले होते. त्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोन अडीच मिनिटांत त्यांनीं बारची पार दुर्दशा केली आणि धमक्या देत निघून गेले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

याआधी महापालिकेच्या बसवर हल्ला

महानगरपालिकेच्या “आपली बस”वर दोन अज्ञात व्यक्तीने हटोपडीने हल्ला केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास बस वर्धमान नगर वरून लकडगंजच्या दिशेने जात असताना लकडगंज पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर ऍक्टिवावर दोन अज्ञात आले. त्यानंतर आलेल्या दोघांनी आधी बसच्या समोरील काचेवर आणि त्यानंतर बाजूच्या खिडकीच्या काचेवर हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

धक्कादायक ! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या; मानेवर केला चाकूने वार अन् नंतर…

जरीपटकाच्या मिसाळ ले-आऊट परिसरात मानेवर चाकूने वार करत तरुणाला संपवले. या हत्याकांडातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आदित्य प्रदीप मेश्राम (वय २२, रा. बाराखोली, इंदोरा) असे मृताचे नाव आहे. अटकेतील आरोपींमध्ये प्रीत अजय बोरकर (वय २४, रा. बाराखोली) आणि आविष्कार रवींद्र नाईक (वय २४, रा. बेझनबाग) यांचा समावेश आहे. आदित्य इलेक्ट्रिशियनचे काम करायचा तर आरोपी मजुरी करतात. गेल्या रविवारी आदित्य त्याचा मित्र रोहित मस्के याच्यासोबत इंदोराच्या फ्रेंड्स सावजी भोजनालयात जेवायला गेला होता. प्रीत आणि आविष्कारही तेथे जेवण करण्यासाठी आले होते. चौघेही मद्यधुंद होते. काही कारणातून रोहित आणि प्रीतमध्ये वाद झाला. तेव्हा रोहितने प्रीत आणि आविष्कारला जबर मारहाण केली होती.

Mumbai Drug Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० महिन्यांत ₹६७९ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ला का करण्यात आला?

    Ans: उधारीचं मद्य व जेवणाचं बिल मागितल्यामुळे.

  • Que: हल्ला किती वेळ चालला?

    Ans: अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत बारची नासधूस झाली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Nagpur crime goons vandalized the urvashi bar in two and a half minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

प्रियकराच्या घरी राहणाऱ्या तरुणीचा मृत्यू, प्राइवेट पार्टमध्ये सापडले कापडाचे तुकडे, हत्येचं धक्कादायक कारण समोर
1

प्रियकराच्या घरी राहणाऱ्या तरुणीचा मृत्यू, प्राइवेट पार्टमध्ये सापडले कापडाचे तुकडे, हत्येचं धक्कादायक कारण समोर

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर
2

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर

Bihar Crime : बापरे! दोन्ही डोळे काढले, प्रायव्हेट पार्ट कापलं अन्…;  नेमकं प्रकरण काय?
3

Bihar Crime : बापरे! दोन्ही डोळे काढले, प्रायव्हेट पार्ट कापलं अन्…;  नेमकं प्रकरण काय?

Love Triangle मधून प्रियकराची निर्घृण हत्या! चाकू आणि सर्जिकल ब्लेडने तरुणावर वार, प्रियकाराचा काटा काढण्याचा कट रचला अन्…
4

Love Triangle मधून प्रियकराची निर्घृण हत्या! चाकू आणि सर्जिकल ब्लेडने तरुणावर वार, प्रियकाराचा काटा काढण्याचा कट रचला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.