मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! (Photo Credit- X)
हेरॉइन प्रकरणांमध्ये ६४ जणांना अटक
जवळपास १,६०२ किलोग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहेत. तरुण पिढीमध्ये वाढत्या अमली पदार्थाच्या वापरावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी धड़क कारवाई सुरू केली आहे. या काळात एकूण ९७१ ड्रग्जशी संबंधित प्रकरणे नोंदवण्यात आली आणि १,१९५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार सर्वात जास्त जाती ही गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदाथांची करण्यात आली आहे. गेल्या व्यर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १९१ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.
हे देखील वाचा: ED Raids in Mumbai: मनी लाँड्रिंग प्रकरणात EDची मुंबईत छापेमारी
जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ मधील ड्रग्ज जप्तीची आकडेवारी
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत पोलिसांनी हेरॉइन जप्तीशी संबंधित ४९ गुन्हे नोंदवले. हेरॉइनशी संबंधित प्रकरणामध्ये ६४ जणांना अटक करण्यात आली आणि ६ कोटी रुपयांचे २.०२ किलोग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले, पोलिसानी चरस जप्तीशी संबंधित एकूण १९ गुन्हे दाखल केले आहेत. चरसशी संबंधित प्रकरणांमध्ये ३१ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी १० महिन्यांच्या कालावधीत केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
| अंमली पदार्थ | दाखल प्रकरणे | अटक आरोपी | जप्त केलेले प्रमाण |
| हेरॉइन | ४९ | ६४ | २.०२ किलोग्रॅम |
| चरस | १९ | ३१ | २३.२५ किलोग्रॅम |
| गांजा | ५८४ | ६३६ | १,३०० किलोग्रॅम |
| कोकेन | १९ | ३१ | १०.७२ किलोग्रॅम |
| एमडी (MD) | २३३ | ३२० | २६५.४७ किलोग्रॅम* |
कोकेन जप्त; १९ गुन्हे दाखल
मुंबईत उच्च दर्जाच्या औषधाच्या जप्तीचा सदर्भ देताना आकडेवारीवरून असे दिसून येते की, पोलिसांनी कोकेन प्रकरणी १९ गुन्हे दाखल केले आहेत, कोकेनशी संबंधित प्रकरणामध्ये ३१ जणांना अटक करण्यात आली आहे आणि ८२.१३ कोटी रुपयांचे १०.७२ किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसानी अमली पदार्थविरोधी २३३ गुन्हे दाखल केले आहेत. यातील ३२० जणांना अटक करण्यात आली आहे आणि ५२९ कोटी रुपयांचे २६५.४७ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, अंमली पदार्यांच्या गैरवापराच्या प्रकरणांबद्दल या वर्षी पोलिसांनी ५.५८२ अंमली पदाधांच्या गैरवापराचे प्रकरण नोंदवले आहेत आणि या प्रकरणांमध्ये ४,६५९ जणांना अटक केली आहे.






