
crime (फोटो सौजन्य: social media)
नागपूर: नागपूरमधून एक हत्येची थरारक घटना समोर आली आहे. बालपणीचा राग मनात ठेवला आणि त्याच रागातून पुतण्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने काकांची निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. कुणाल कुंभारे असे आरोपीचे नाव आहे. तर डोमा कुंभारे हे काकाचे नाव आहे.
काय घडलं नेमकं?
कुणालने बालपणीचा राग मनात धरून आपल्या काकाची हत्या केली. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास डोम कुंभारे हे आपल्या मोपेड दुचाकीवरून पारडी भागातील तळमळे वाडी परिसरातून घरी परतत होते. याचवेळी कुणाल हा दबा धरून बसला होता. आरोपी कुणालने आपल्या दोन साथीदारांसह त्यांना अडवले. काका डोमा यांना अडवल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर लगेच तिन्ही आरोपींनी डोमा यांच्यावर चाकूने अतिशय निर्दयीपणे सपासप वार केले. हा हल्ला इतका तीव्र होता की, डोमा यांना प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. डोमा हे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आणि परिसरात खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या डोमा यांना स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना मृत घोषित केले.
तडीपार गुन्हेगारासह कोयतेधाऱ्यांना ठोेकल्या बेड्या; लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई
डोमा कुंभारे हे मोलमजुरी करून पोट भरत होते. याप्रकरणी पारडी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी कुणाल कुंभारे आणि त्याचे दोन साथीदार सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय झाली आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
कोणता राग होता मनात?
डोमा कुंभारे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी कुणाल कुंभारेच्या आईला पळवून नेले होते. ते पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. यामुळे कुणाल कुंभारे यांच्या मनात लहानपणापासून राग होता. तसेच दुसरीकडे यावरुन कौटुंबिक कलह देखील सुरु होता. कुणालची आजी त्याचा सांभाळ करत होती. यामुळे कुणालने मोठा झाल्यावर काकाला संपवण्याचा निर्णय घेतला होता.
पोलिसांचे आवाहन
या हत्येनंतर पारडी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पारडी पोलिसांची पोलिसांनी आरोपींची माहिती देण्याचे आवाहनही केले आहे.पोलीस या घटनेचा तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पाथर्डी तालुक्यात एकाच दिवसात 4 आत्महत्या! परिसरात भीतीचे वातावरण, नेमकं घडलं काय?
Ans: कुणाल
Ans: नागपूर
Ans: डोमा
Ans: