Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: NEET विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर नवा ट्विस्ट; सुसाईड नोटवरून पोलिसांच्याच भूमिकेवर संशय

NEET विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदी आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. आकांक्षाची सुसाईड नोट पहिल्याच दिवसापासून पोलिसांकडे असल्याचा दावा समोर आला असून ती अधिकृत नोंदीत नमूदच करण्यात आली नव्हती. याप्रकरणी तपास अधिकारी निखिल तव्हाणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 07, 2026 | 10:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आकांक्षा चतुर्वेदी आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोटवरून नवा वाद.
  • सुसाईड नोट पोलिसांकडे असूनही नोंद न केल्याचा आरोप.
  • तपास अधिकारी निखिल तव्हाणे यांना कारणे दाखवा नोटीस.
नागपूर: देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी आणि फेरपरीक्षेच्या वादात नागपूरमधील 19 वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदीच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडवली होती. मात्र आता या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. आकांक्षाने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून नागपूर पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटी समोर आल्या असून, ही नोट अनेक दिवस लपवून ठेवण्यात आली होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यावरच वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.

काय घडलं नेमकं?

२० मे रोजी आकांक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करून एनडीए (NTA) आणि सरकारवर टीका केली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता, पोलिसांनी “अशी कोणतीही सुसाईड नोट आमच्याकडे नाही, ती असल्यास चतुर्वेदी कुटुंबाने पोलिसांकडे सुपूर्द करावी,” अशी तोंडी माहिती दिली होती. चार जूनपर्यंत पोलिसांनी हाच दावा केला होता.

Satara Crime: कराडमध्ये अभियंत्याचा ‘अपघात’ नव्हे तर कट! पत्नी आणि मेहुण्यानेच रचला घातपात; CCTV समोर

मात्र आता ही सुसाईड नोट पहिल्याच दिवसापासून तपास अधिकारी निखिल तव्हाणे यांच्याकडे होती. त्यांनी स्टेशन डायरीमध्ये आणि आत्महत्येशी संबंधित कागदपत्रांमध्ये या सुसाईड नोटची नोंदच केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी हयगय केल्याचा आरोप करत निखिल तव्हाणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

व्हिडिओ व्हायरल

आकांक्षाच्या नातेवाईकांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आकांक्षाने २० मे रोजी टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्याच दिवशी तिची सुसाईड नोट खोलीतील एका टेबलावर सापडल्याचा आणि त्याच दिवशी आकांशाच्या कुटुंबीयांनी टी सुसाईड नोट पहिल्याच दावा केला आहे. मात्र आपल्या लेकीच्या आत्महत्येमुळे गोंधळून गेलेल्या कुटुंबीयांनी ती सुसाईड नोट त्याच दिवशी पोलिसांच्या स्वाधीन केली नव्हती, असा खुलासा ही आकांक्षाचे चुलत बंधू या व्हायरल व्हिडिओमध्ये करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 20 मे रोजी ही घटना घडलेली असताना अनेक दिवस आकांक्षाची सुसाईड नोट समोर का येऊ शकली नाही? ती नागपूर पोलिसांनी लपवून ठेवली की आकांक्षाच्या कुटुंबीयांनीच ती पोलिसांना उशिरा स्वाधीन केली? या बद्दलचे गूढ अधिकच वाढले आहे. आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Baramati Accident: भीषण अपघात! इलेक्ट्रिक स्कुटीला आयशरची जोरदार धडक; दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आकांक्षा चतुर्वेदीने आत्महत्या कधी केली?

    Ans: आकांक्षाने 20 मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांवर काय आरोप झाले?

    Ans: : सुसाईड नोटची नोंद न करता ती लपवून ठेवल्याचा आरोप पोलिसांवर झाला आहे..

  • Que: तपास अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई झाली?

    Ans: तपास अधिकारी निखिल तव्हाणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: Nagpur crime new twist following neet students suicide police role under scrutiny due to suicide note

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश
1

Sonam Raghuvanshi: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सोनम रघुवंशीचा जामीन रद्द, 3 आठवड्यांत सरेंडरचे निर्देश

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: 100 रुपयांचे आमिष, तोंड दाबून रिक्षात ओढलं; तीन नागरिकांनी वाचवला 10 वर्षीय चिमुकलीचा जीव

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ
3

Jalgaon Crime: सकाळी कामावर गेला, काही वेळातच मृतावस्थेत सापडला; जळगावातील गूढ मृत्यूने खळबळ

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
4

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.