
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय प्रकरण?
किरणने आपल्या कौटुंबिक आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पाडण्यासाठी आणि नौकरी मिळवण्याच्या उद्देशाने स्वप्नील जयदेव लांबघरे याच्याशी लग्न केले होते. २०२० मध्ये त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. स्वप्नील याने तिला वेकोलीमध्ये (WCL) नोकरी लावून देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र लग्नानंतरही किरण माहेरीच राहत होती.
स्वप्नील हा नौकरीच्या आश्वासनावर टाळाटाळ करत होता. यामुळे किरण आणि तिच्या कुटुंबात तणाव वाढू लागला. स्वप्नील तिच्यावर संबंधांसाठी दबाव टाकत होता शिवीगाळ करत मानसिक त्रास देत होता. या सततच्या छळामुळे किरण मानसिक तणावात होती.
घटस्फोटाची याचिका दाखल
आपला छळ होत असल्याचे आणि फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर किरणने कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका देखील दाखल केली होती. तरीही छळ सुरूच राहिला. स्वप्नीलने केलेले मेसेजेस आणि धमक्यांचे सर्व पुरावे तिने आपल्या फोन मध्ये जपून ठेवले होते. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८: ३० च्या दरम्यान किरणने आपल्या माळेगाव येथील घरात कीटकनाशक प्राशन केले. घरच्यांना माहिती होताच तातडीने तिला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान ७ डिसेंबर रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.
याप्रकरणी सावनेर पोलिसांनी स्वप्नील जयदेव लांबघरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष आणि फसवणूक करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या आरोपी स्वप्नील लांबघरे याचा कसून शोध पोलीस घेत आहे.
लग्नाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेयसीने केला प्रियकरावर चाकूने वार
नागपूरच्या नंदनवन कॉलनीतून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीनेच प्रियकरावर चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याच्या हत्येनंतर प्रेयसीने स्वतःवर देखील वार करून गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे. तिने आधी पोलिसांना प्रियकराने आपल्यावर वार करून स्वतःवर वार केल्याचे सांगितले. मात्र पोलिसांच्या संशयाने नंतर सत्य सगळं समोर आलं. आरोपी तरुणीने ही बीएएमएसची विद्यार्थिनी असून ती इंटर्नशिप करीत होती. तर मृतक हा पोलीस भरतीची तयारी करत होता.
Navi Mumbai Crime: लग्नासाठी भारतात आलेल्या स्वीडिश तरुणाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू!
Ans: नोकरीचे आमिष, फसवणूक आणि दीर्घकाळ चाललेल्या मानसिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली.
Ans: तिचा पती स्वप्नील जयदेव लांबघरे आरोपी आहे आणि त्याचा शोध सुरू आहे.
Ans: सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.