Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur: ‘मैत्री’च्या नावाखाली रचला सैतानी कट! गळ्यावर चाकू अन् हात बेडला…; 16 वर्षीय मुलीला फ्लॅटमध्ये डांबून 24 तास अमानुष छळ

नागपुरात सोशल मीडियावर झालेली ओळख १६ वर्षीय मुलीसाठी भयावह ठरली. १९ वर्षीय तरुणाने तिला भाड्याच्या फ्लॅटमध्ये २४ तास ओलीस ठेवून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी दार तोडून मुलीची सुटका करत आरोपीला अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 06, 2026 | 09:29 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या १९ वर्षीय तरुणाने १६ वर्षीय मुलीला २४ तास फ्लॅटमध्ये ओलीस ठेवले.
  • पोलिसांनी सायबर तपास आणि लोकेशनच्या आधारे दार तोडून मुलीची सुटका केली.
  • आरोपीविरुद्ध POCSOसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये सोशल मीडियावरील १९ वर्षीय इंस्टाग्राम फ्रेंडने अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला २४ तास ओलीस ठेवून तिचा अतोनात शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि फिल्मी स्टाईलने फ्लॅटचे दार तोडून मुलीची सुटका केली. या कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून, घटनेमुळे सोशल मीडियावरील आभासी मैत्रीच्या धोक्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बारावीत शिकत असून ती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वी तिची इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर एका १९ वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. आरोपीने स्वतःचे नाव ‘आकाश मेहरा’ असे सांगत तिचा विश्वास संपादन केला. हळूहळू दोघांमध्ये नियमित संवाद सुरू झाला आणि आरोपीने तिच्यावर मानसिक नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर तिच्या मोबाईलवरील ‘पॅरेंटल कंट्रोल’ची माहिती मिळवत तिच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला.

भाड्याने फ्लॅट घेतला

१ ऑगस्ट रोजी आरोपी नागपुरात आला. दिघोरी परिसरात एका ॲपच्या माध्यमातून भाड्याने फ्लॅट घेतल्यानंतर त्याने मुलीला भेटण्यासाठी बोलावले. रविवारी सकाळी मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून मुलगी घरातून बाहेर पडली; मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. तिचा मोबाईलही बंद लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी तातडीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत अपहरणाची तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. मुलीच्या सोशल मीडिया अकाउंट्स, कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान तिच्या घरच्या लँडलाईनवर आलेला एक संशयास्पद फोन आणि इंस्टाग्राम चॅट पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरला. सायबर पथकाने आरोपीची ओळख, त्याचा ठाण्यातील पत्ता आणि त्याच्या कुटुंबीयांपर्यंत संपर्क साधला.

त्यानंतर नागपूर पोलिसांनी ठाणे पोलिसांची मदत घेत आरोपीच्या आईमार्फत त्याला फोन करण्यास सांगितले. फोन सुरू होताच सायबर तज्ज्ञांनी त्याचे लोकेशन नागपूरातील दिघोरी परिसरातील एका फ्लॅटमध्ये असल्याचे निश्चित केले. योगायोगाने त्याचवेळी आरोपीने ऑनलाईन फूड ऑर्डर केली होती. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयच्या मदतीने फ्लॅटचा अचूक दरवाजा गाठला.

हात बांधले आणि गळ्यावर चाकू…

पोलिसांनी दार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. समोरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. आरोपीने मुलीचे हात बेडच्या रेलिंगला बांधले होते आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवला होता. पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपीला झडप घालून पकडले आणि मुलीची सुखरूप सुटका केली.

लेदरच्या पट्ट्याने मारहाण…

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या २४ तासांच्या काळात आरोपीने मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिच्यावर धारदार शस्त्राने जखमा केल्या, धातूचे खिळे असलेल्या लेदरच्या पट्ट्याने मारहाण केली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे विडिओ फोटो देखील काढल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हँडकफ्स, सेक्स टॉईज, लेदरचे पट्टे, चाकू तसेच इतर साहित्य जप्त केले आहे.

गुन्हा दाखल

पीडित मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती मानसिक धक्क्यात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशेष POCSO न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. फॉरेन्सिक तपास, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि डीएनए नमुन्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात.

  • Que: मुलीची सुटका कशी करण्यात आली?

    Ans: पोलिसांनी फ्लॅटचे दार तोडून सुटका केली.

  • Que: आरोपीवर कोणत्या प्रकारचे आरोप आहेत?

    Ans: अल्पवयीन मुलीला ओलीस ठेवणे, छळ आणि POCSO अंतर्गत गुन्हे.

Web Title: Nagpur diabolical plot hatched under the guise of friendship knife to the throat hands bound 16 year old girl held captive in a flat and subjected to brutal torture for 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली
1

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
4

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.