Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News: नागपुरात अफवेचा कहर! ‘मुलं चोरणारी टोळी’ समजून वृद्ध महिलेला जमावाकडून बेदम मारहाण

नागपूर येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ सक्रिय असल्याच्या सोशल मीडियावरील अफवेने एक धक्कादायक प्रकार घडला. पाणी मागणाऱ्या 60 वर्षीय महिलेला अपहरणकर्ती समजून जमावाने मारहाण केली; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तिचा जीव वाचवला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 14, 2026 | 08:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नागपूर मध्ये अफवेमुळे 60 वर्षीय महिलेला जमावाची मारहाण.
  • मुलं चोरणारी टोळी असल्याचा सोशल मीडियावर खोटा अपप्रचार.
  • पोलिसांनी हस्तक्षेप करत वृद्ध महिलेची सुखरूप सुटका केली.
नागपूर: नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या सोशल मीडियावरील खोट्या आणि तथ्यहीन अफवांमुळे शहरात एका वृद्ध महिलेचा जीव जाताजाता थोडक्यात बचावल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कसंतरी या वृद्धेची सुखरूप सुटका केली. ही घटना हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत इसासनी परिसरात घडली.

‘डिजिटल अरेस्ट’ अन् कोट्यवधींवर डल्ला; पुण्यात अटकेची भीती दाखवत ज्येष्ठ नागरिकाला लुटले

काय नेमकं प्रकरण?

साठ वर्षीय महिला या त्यांच्या नेहमीचं औषध घेण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. औषध घेऊन त्या घरी परतत असतांना दुपारी थकवा आल्याने तसेच रोजची औक्षण घेण्याची वेळ झाल्यामुळे औषध खाण्यासाठी थांबल्या. त्यावेळी त्यांनी त्यांनी जवळील घरासमोर खेळणाऱ्या एका लहान मुलाकडे पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, मराठी आणि हिंदी भाषा नीट येत नव्हती त्यांनी भोजपुरीमध्ये आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

महिलेचे आरोप आणि बेदम मारहाण

त्यावेळी त्याच ठिकाणी असलेल्या एका दुसरी महिलेने आरडाओरडा करत साठ वर्षीय महिलेवर गंभीर आरोप केले. तिच्या लहान मुलीला एका बॅगमध्ये टाकून अपहरण करण्याचा प्रयत्न करत होती, असा खोटा आरोप केला. एवढेच नाही तर जोरदार गोंधळ घातला. मराठी आणि हिंदी नीट बोलता येत नसल्यामुळे भोजपुरी भाषिक ती वृद्ध महिला आपला बचाव करू शकली नाही. आरोप करणाऱ्या महिलेने त्या वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे सुरु केले. त्या ठिकाणी उपस्थित लोकांचाही गैरसमज झाला आणि त्यांनी देखील गर्दीतील काही लोकांनीही तिला मारहाण करण्यास प्रोत्साहन दिले.

पोलिसांनी केली सुटका

पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कशी तशी त्या महिलेची जमाकडून सुटका करण्यात आली. तिला सुरक्षित पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये वृद्ध महिलेच्या मुलाला आणि सुनेला बोलावण्यात आले आणि सर्व प्रकार उघडकीस आला. या मारहाणीत वृद्ध महिलेचा जीव जाताजाता वाचला.

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला ठोकल्या बेड्या; 4 पिस्तुले अन् 7 जिवंत काडतुसे जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नागपूरमधील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत इसासनी परिसरात घडली.

  • Que: महिलेला का मारहाण करण्यात आली?

    Ans: ती मुलं चोरणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचा गैरसमज झाल्यामुळे जमावाने तिला मारहाण केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वृद्ध महिलेला जमावातून वाचवले आणि तिला सुरक्षित पोलीस ठाण्यात नेले.

Web Title: Nagpur news rampant rumors in nagpur elderly woman brutally beaten by mob after being mistaken for a child kidnapping gang member

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Pune Crime : भयावह कृत्य! 65 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, नंतर दगडाने ठेचून मृतदेह शेणाच्या…
1

Pune Crime : भयावह कृत्य! 65 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, नंतर दगडाने ठेचून मृतदेह शेणाच्या…

Mumbai Crime : NCB ची मोठी कारवाई; 349 किलो कोकेन जप्त, 1745 कोटींचा ड्रग रॅकेट उघड; अमित शहांनी दिली माहिती
2

Mumbai Crime : NCB ची मोठी कारवाई; 349 किलो कोकेन जप्त, 1745 कोटींचा ड्रग रॅकेट उघड; अमित शहांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.