Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: ‘हेल्प… हेल्प…’च्या आर्त हाका! इम्पेरियल हाइट्सच्या आगीत दोन महिलांचा मृत्यू

नालासोपारा पूर्वेकडील इम्पेरियल हाइट्स इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागून दोन महिलांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. २० ते २५ रहिवाशांची सुटका करण्यात आली. बचावकार्यादरम्यान अपुऱ्या जागेमुळे अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 14, 2026 | 09:29 AM
image

image

Follow Us
Follow Us:
  • इम्पेरियल हाइट्सच्या आगीत दोन महिलांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू
  • २० ते २५ रहिवाशांची सुखरूप सुटका; १४ वर्षीय मुलीला पोलिसाने वाचवले
  • अपुऱ्या जागेमुळे बचावकार्यात अडथळे; इमारतीच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह
 

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील इम्पेरियल हाइट्स इमारतीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. या दुर्घटनेत फाल्गुनी शाह (५०) आणि अश्विनी पारकर (५०) या दोन महिलांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सहा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. आग लागल्यानंतर इमारतीतील अनेक रहिवासी जीव वाचवण्यासाठी खाली धावले. मात्र, वरच्या मजल्यांवरील काही नागरिक अडकून पडले. सातव्या, नवव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या मजल्यांवरील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी शर्थ करावी लागली. सुमारे २० ते २५ रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.

पोलिसाने मुलीला खांद्यावर घेत वाचवले

आगीच्या धुरामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. मदतीसाठी नागरिक ‘हेल्प… हेल्प…’ अशा आर्त हाका देत होते. दरवाजात अडकलेल्या १४ वर्षीय मुलीला एका पोलिस कर्मचाऱ्याने दरवाजा तोडून बाहेर काढले. स्वतःचा जीव धोक्यात घालत त्याने मुलीला खांद्यावर घेत सुरक्षित ठिकाणी आणले. दरम्यान, इमारतीच्या बाहेरील छोट्या जागेचा आधार घेत चार जण तब्बल ४० ते ४५ मिनिटे मदतीची प्रतीक्षा करत होते. अखेर मोठ्या क्रेनच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

अग्निशमन दलाला मोठ्या अडचणी

इमारतीच्या आजूबाजूला जागा कमी असल्याने अग्निशमन दलाच्या वाहनांना आणि मोठ्या लॅडर मशीनला इमारतीजवळ पोहोचताना अडथळे निर्माण झाले. त्यामुळे बचावकार्य अधिक आव्हानात्मक ठरले. अतिरिक्त मदतीसाठी मीरा-भाईंदर येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या. या दुर्घटनेनंतर टोलेजंग इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. इमारतीला परवानगी देताना अग्निशमन वाहनांच्या हालचालींसाठी पुरेशी जागा ठेवण्यात आली होती का? इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती का? नियमित फायर ऑडिट झाले होते का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असला, तरी अधिकृत तपासानंतरच आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.

Web Title: Nalasopara imperial heights building fire two women dead sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • building
  • fire Accident
  • Mumbai fire news
  • nalasopara news

संबंधित बातम्या

Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप; ७०-८० तरुणींच्या दाव्याने नालासोपारा हादरला
1

Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप; ७०-८० तरुणींच्या दाव्याने नालासोपारा हादरला

Nalasopara Navratri Violence : नालासोपाऱ्यात नवरात्रोत्सवाला गालबोट! दोन गटांत तुफान हाणामारी, महिलांसह 10 जण जखमी
2

Nalasopara Navratri Violence : नालासोपाऱ्यात नवरात्रोत्सवाला गालबोट! दोन गटांत तुफान हाणामारी, महिलांसह 10 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.