Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime:नांदेड हादरलं! मुलाने पेटत्या दुचाकीवर वडिलांना ढकलले; उपचारादरम्यान मृत्यू

नांदेडच्या बामणी गावात किरकोळ वादातून मुलाने पेटत्या दुचाकीवर वडिलांना ढकलले. गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2026 | 10:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ वादातून मुलाकडून भीषण कृत्य
  • पेटत्या दुचाकीवर ढकलल्याने वडिलांचा मृत्यू
  • दारूच्या नशेत वाद वाढल्याचा संशय
नांदेड: नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शुल्लक वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यालाच पेटत्या दुचाकीवर ढकलल्याचे समोर आहे. या भीषण घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या वडिलांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला असून, या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना हदगाव तालुक्यातील बामणी गावात घडली.

काय घडलं नेमकं?

२५ मार्च रोजी बामणी शिवारात हे कुटुंब शेतात हरभरा (चना) काढणीच्या कामात व्यस्त होते. दिवसभर आई- वडील, मुलगा आणि सून यांनी कष्ट केले. सायंकाळी मळणी यंत्र (थ्रेशर) येणार असल्याने वडिलांनी मुलाला शेतातच थांबण्यास सांगितले. मात्र, वडिलांचा शब्द डावलून मुलगा फाट्यावर गेला आणि दारुण पियुन परतला. यावेळी वडीलही दारूच्या नशेत असल्याने दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. याच बाचाबाचीचा रूपांतर वादात झाला आणि संतापलेल्या वडिलांनी शेतातील कचरा जमा करून मुलाची दुचाकी पेटवून दिली.

Beed Crime: बीड हादरलं! 17 वर्षीय विवाहित मुलीचा विहिरीत संशयास्पद आढळला मृतदेह

हा प्रकार बघत मुलगा संतापला आणि त्याने विचार न करता आपल्या वडिलांनाच धागडगत्या दुचाकीवर ढकलून दिले. वडिलांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला आणि ते यात होरपळले. दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. मनाठा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

नांदेडमध्ये रक्ताचा खेळ! 70 तासांत 5 खून; नांदेडमध्ये कायद्याचा धाक संपला?

नांदेडमध्ये रक्ताचा खेळ सुरु असल्याचे समोर आले आहे. गेल्या ७० तासात ५ हत्यांच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे नांदेडमध्ये कायद्याचा धाक संपला का? असा सवाल आता विचारला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अश्यात आता पहाटे श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आली आहे.

कठोर कारवाई

दोन दिवसांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर काल एका तरुणाचा आणि आज पहाटे पाचवा हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहे. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी आक्रमक मागणी केली असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

Thane Crime: विश्वासघाताची परिसीमा! खासगी बोलायचं आहे म्हणत हॉटेलमध्ये नेले; गुंगीचं औषध देत दोन वेळा अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बामणी गावात.

  • Que: वाद कशामुळे झाला?

    Ans: शेतातील काम आणि दारूच्या नशेतून झालेल्या बाचाबाचीमुळे.

  • Que: पोलिस काय करत आहेत?

    Ans: प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे.

Web Title: Nanded crime nanded shaken son pushes father onto burning two wheeler father dies during treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Sahil Chougule : विधान परिषदेतील आरोपांवर घरमालकाचे स्पष्टीकरण; रबाळे पोलिसांकडून दबाव नसल्याचा दावा
1

Sahil Chougule : विधान परिषदेतील आरोपांवर घरमालकाचे स्पष्टीकरण; रबाळे पोलिसांकडून दबाव नसल्याचा दावा

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
2

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स
3

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट
4

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.