Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: मध्यरात्री पत्नीवर तीन राऊंड गोळीबार, आरोपी पती फरार; कौटुंबिक वादाचं धक्कादायक रूप

नांदेडच्या लोहा शहरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2026 | 08:18 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लोहा शहरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर गावठी कट्ट्यातून तीन राऊंड गोळीबार केला.
  • जखमी महिलेवर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
  • आरोपी पती फरार असून त्याचा शोध सुरू आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेड: नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात कौटुंबिक वादाने भीषण वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री झालेल्या वादानंतर संतापलेल्या पतीने स्वतःच्या पत्नीवर गावठी कट्ट्यातून सलग तीन राऊंड गोळीबार केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे लोहा शहरात खळबळ उडाली असून अवैध शस्त्रसाठ्याचाही प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीचं नाव विशाल जाधव असे आहे. तर त्याच्या पत्नीचे नाव अर्चना असे आहे. विशाल आणि अर्चना या दोघात सोमवारी मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले. या वादातून विशालने रागाच्या भरात पत्नी अर्चनावर विनापरवाना गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी तिच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत घुसल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर तिला तातडीने नांदेडला हलवण्यात आले. सध्या तिच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनतर विशाल तिथून फरार झाला.

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाने पुरावे संकलित केले आहेत. फरार आरोपी विशालवर यापूर्वी मे 2025 मध्ये पेट्रोल पंप लुटीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो सध्या जामिनावर बाहेर होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली आहेत. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर शहरातील वाढता अवैध शस्त्रसाठा आणि गुन्हेगारीवर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

अन्न व औषध प्रशासनाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मंचर (जि. पुणे) येथे करून दूध भेसळीतील मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. कृत्रिम दूध निर्मितीच्या संशयातून २६ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत पोहोचले असून तिघांना ताब्यात घेतले आहे. मंचरच्या कारवाईत पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव आदी ठिकाणचे आरोपी समोर आले आहेत. या २६ आरोपींपैकी राहुरी तालुक्यातील तीन आणि नगर तालुक्यातील वाळकी येथील एक असे चौघे अहिल्यानगरचे आहेत.

Bengaluru Crime: ‘बेडवरून पडली’ असं सांगितलं, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड केलं धक्कादायक सत्य; बापावरच हत्येचा गुन्हा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात.

  • Que: गोळीबारात महिलेची प्रकृती कशी आहे?

    Ans: ती गंभीर जखमी झाली असून उपचारानंतर तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.

  • Que: आरोपीबाबत पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी फरार असून त्याच्या अटकेसाठी विशेष पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: Nanded crime wife shot three times at midnight accused husband absconding a shocking turn in a domestic dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
1

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
3

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
4

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.