नारायणगाव: नारायणगाव वारूळवाडी (ता. जुन्नर) परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांना धमकावून जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकल्या असून, चोरट्यांकडून मु्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अभंग वस्ती येथे राहणाऱ्या चंद्रिका कुमार रामचंद्र महातो वय ३० वर्षे धंदा मजुरी या वारूळवाडी येथील स्मशानभूमी जवळील पुलावरून शनिवार दि. २९ रोजी दुपारी जात असताना त्यांच्या मागून दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यातील एकाने तंबाखू आहे का असे विचारले? तर दुसऱ्याने फिर्यादीच्या गळ्यातील दुर्गा मातेचे चित्र असलेले सोन्याचे पदक हिसकावून घेऊन पुलाखालून नदिपात्रात पळून गेला. या आशयाची फिर्याद पोलीस स्टेशनला देण्यात आली होती.
नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबी तपासून शुभम पंढरीनाथ पोखरकर (वय २१ वर्ष राहणार पिंपळगाव खडकी, तालुका आंबेगाव) आणि तेजस बबन शेळके (वय २१ वर्षे रा. नगदवाडी कांदळी तालुका जुन्नर) यांना बेड्या ठोकल्या चोरट्यांकडून दहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पेंडल हस्तगत केले.
खडकी बाजरात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर टोळक्याचा हल्ला
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खडकी बाजरात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खडकी बाजरात खरेदीसाठी आलेल्या तरुणावर टोळक्याचा हल्ला; शस्त्राने सपासप वार केले अन्…
विशाल दीपक काळे (वय २०, रा. फुलेनगर, विश्रांतवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गणेश दादू पातरकर (वय १७, रा. फुलेनगर, विश्रांतवाडी) याने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दीपक आणि गणेश खडकी बाजारात शनिवारी कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका टोळक्याने त्यांना अडवले. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर टोळक्याने त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यांच्या तावडीतून विशालने पळ काढला. त्यानंतर टोळक्याने पाठलाग करून त्याला होळकर पुलाजवळ गाठले. त्याला बेदम मारहाण केली. त्याच्याकडील दीड हजार रुपये आणि मोबाइल काढून घेतला. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे तपास करत आहेत.