Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Accident: नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी अंत

नाशिकच्या दिंडोरीत भरधाव कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बचावकार्य सुरू असतानाही सर्वांचा मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 04, 2026 | 09:10 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भरधाव कार विहिरीत कोसळली
  • एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू
  • NDRF व स्थानिकांकडून बचावकार्य
नाशिक: नाशिक येथून एक अपघाताची भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव चार चाकी गाडी विहिरीत कोसळली. यात एकूण ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेले ९ जण हे एकाच कुटुंबातील आहे आणि यात तीन ते चार जणांचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरु होती. घटनास्थळी शोधमोहिमेदरम्यान मोठा जमाव झाला होता.

थेट गॅस टँकरमधूनच गॅसचोरी; व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस

अपघात कश्यामुळे झाला अद्याप अस्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (३ एप्रिल २०२६) रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात एक ईरटीका कार क्रमांक MH15-JS-1053 शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत कोसळली. यावेळी गाडीत एकूण ९ जण होते. ईरटीका गाडीसह गाडीतील नऊ जण विहिरीत कोसळले आणि ९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर NDRF, प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू होते. मात्र विहिरीत पाणी असल्याने आणि अंधारात दिसत नसल्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. अपघातातील कार क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर कारमध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळाली असून कारमधील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन ते चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. अद्याप कश्यामुळे अपघात झाला हे स्पष्ट झालेले नाही आहे.

कार्यक्रमातून परतत असतांना अपघात

या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघाता मागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. अपघातातील मृत हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असल्याचे समजते आहे. मृतांमध्ये दरगोडे कुटुंबातील सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे अशा एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा व इतर 4 नातेवाईक असे एकूण नऊ जण होते. एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमावरून परतत असतांना हा अपघात घडला.

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे.

  • Que: किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: एकूण 9 जणांचा मृत्यू झाला.

  • Que: अपघाताचे कारण काय?

    Ans: कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Nashik accident horrific accident in dindori nashik car plunges into a well claiming the lives of 9 members of the same family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
1

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
3

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
4

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.