
crime (फोटो सौजन्य: social media)
दोंघांची प्रकृती चिंताजनक
या दुर्घटनेत दोन लहान मुले, दोन महिला आणि एक पुरुषासह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. या दुघटनेत जखमी झालेल्यांची नावे विनोद थोरात,मोहित जाधव,अतुल शेवाळे,प्रमिला यादव आणि उज्वला महाजन असे आहेत. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली.
दोघांना ताब्यात
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून हा स्फोट कसा झाला याचे नेमके कारण तपासले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी खबरदारी म्हणून चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांचे आवाहन
अपघातासंदर्भाने काहीही अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र या दुर्घटनेत कोणीही मृत्यू झाले नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड यांनी केलं आहे.
खळबळजनक! ४०० कोटींच्या कॅश कंटेनरवरून तरुणाचे अपहरण; कोणाची होती एवढी मोठी रोकड
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धामधुमीत कर्नाटकातील चोरली घाट परिसरातून तब्बल ४०० कोटी रुपयांची रोख रक्कम असलेला एक कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संशयातून नाशिकमधील इगतपुरी येथील संदीप पाटील या तरुणाचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; उद्योजक दाम्पत्याचा मृत्यू, कारमधील एअरबॅग उघडूनही…
Ans: तिरंगी फुगे घेत असताना नायट्रोजन गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.
Ans: एकूण पाच जण जखमी झाले असून त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.
Ans: दोघांना ताब्यात घेऊन स्फोटाचे नेमके कारण तपासले जात आहे.