Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: वाद सोडवायला गेला, पण जीव गमावला! भिवंडीत कौटुंबिक वादातून रक्तरंजित हत्या; तिघे ताब्यात

भिवंडीतील न्यू आझादनगरमध्ये नवरा-बायकोचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या दिलशाद शाह यांच्यावर नातेवाईकांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी दिलशाद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघे आरोपी ताब्यात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 27, 2026 | 08:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नवरा-बायकोचा वाद शांत करण्यासाठी दिलशाद शाह गेले होते मध्यस्थीला
  • नातेवाईकांनी संगनमत करून धारदार शस्त्राने हल्ला केला
  • उपचारादरम्यान मृत्यू; तिघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल
मुंबई: भिवंडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही घटना भिवंडी येथील न्यू आझाद नगर शांतीनगर परिसरात घडली. घरगुती वाद शांत करण्याच्या प्रयत्नात तिघांनी संगनमत करून धारधार शास्त्राने हल्ला केल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी व मृतक हे परस्पर नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; उद्योजक दाम्पत्याचा मृत्यू, कारमधील एअरबॅग उघडूनही…

काय घडलं नेमकं?

मृतकाचे नाव दिलशाद शाह यांची मावस बहीण आणि तिच्या पेटीमध्ये कौटुंबिक वाद सुरु होता. हा वाद शांत करण्यासाठी दिलशाद शहा मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मावस बहिणीला घरी आणले. याचा राग मनात धरून मावस बहिणीच्या पतीचे भाऊ आरोपी आसिफ अब्दुलहकीम शहा, अलिहसन अब्दुलहकीम शहा आणि मुजफ्फर अब्दुलहकीम शहा यांनी संगनमत करून दिलशाद शहा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत दिलशाद शहा याला उपचारासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कौटुंबिक वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी तिघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

भांडुपमध्ये रक्तरंजित हल्ला,भररस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं; परिसरात भीती

मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाची हत्या झाली. या घटनेला २४ तास उलटले नाही तर भांडुप परिसरात आणखी एका तरुणांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. तब्बल २९ वार तरुणाच्या अंगावर करण्यात आले. या सलग दोन घटनांमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

तब्बल २९ वेळा वार

भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकरप्रसाद यादव ऊर्फ कल्ली या कुख्यात गुंडावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोरांनी शंकरावर अत्यंत क्रूरपणे तब्बल 29 वेळा धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमी शंकरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरावर खोलवर झालेल्या जखमा आणि झालेल्या अतिरक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पत्नीचा वैयक्तिक निर्वाह भत्त्याचा दावा फेटाळला; पुणे कुटुंब न्यायालयाचा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: भिवंडीतील न्यू आझादनगर, शांतीनगर परिसरात.

  • Que: दिलशाद शाह यांच्यावर हल्ला का करण्यात आला?

    Ans: नवरा-बायकोचा वाद मिटवण्यासाठी ते मध्यस्थी करत होते, याच रागातून हल्ला झाला.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: आसिफ शहा, अलिहसन शहा आणि मुजफ्फर शहा – तिघेही नातेवाईक.

Web Title: Mumbai crime he went to resolve a dispute but lost his life bloody murder in bhiwandi over a family dispute three arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • Bhiwandi Crime
  • crime
  • Mumbai

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी पतीने केली फसवणूक, दुसऱ्या महिलेला बोलवलं अन्…
1

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी पतीने केली फसवणूक, दुसऱ्या महिलेला बोलवलं अन्…

Virar :  पोलिसांच्या पाठपुराव्याला यश;  25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती
2

Virar : पोलिसांच्या पाठपुराव्याला यश; 25 लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

कष्टकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने, किसान सभेचा मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा; २ फेब्रुवारीला मुंबईत धडकणार
3

कष्टकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने, किसान सभेचा मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा; २ फेब्रुवारीला मुंबईत धडकणार

Bihar Crime: नवऱ्याशी भांडणानंतर घर सोडले, बिहारची महिला बंगालच्या रेड लाईट एरियात विकली; कस्टमरमुळे सुटका
4

Bihar Crime: नवऱ्याशी भांडणानंतर घर सोडले, बिहारची महिला बंगालच्या रेड लाईट एरियात विकली; कस्टमरमुळे सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.