Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime : अशोक खरातनंतर ‘महेशगिरी बाबा’चा भयानक कांड समोर, ‘दैवी शक्ती’चा दावा रुद्राक्षाची भीती आणि…

नाशिकच्या निफाडमध्ये भोंदू महेशगिरी बाबाने दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेची फसवणूक करून तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला. अंनिसच्या मदतीने पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 23, 2026 | 10:05 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ‘बाधा काढतो’ म्हणत भोंदू बाबाकडून महिलेचे शोषण
  • व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज, लॉजवर नेऊन अत्याचार
  • अंनिसच्या मदतीने गुन्हा दाखल; आरोपी फरार
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा अशोक खरात याचे भयानक कांड समोर आल्यानंतर अनेक बाबांचे प्रकार समोर येत आहे. आता निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथील एका भोंदू बाबाचा काळा कारनामा उघडकीस आला आहे. कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आणि भूतबाधा उतरवण्याचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाणीवपूर्वक वणवा लावाल तर….; Satara वनविभागाची मोठी कारवाई, एक आरोपी अटकेत

काय नेमकं प्रकरण?

पीडित महिलेचे कुटुंब घरगुती ताणतणावात आणि मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे त्रस्त होते. यासाठी ते धरणगाव येथील महेशगिरी याच्या तथाकथित ‘प्रति गाणगापूर’ मठात गेले. यावेळी भोनि महेशगिरीने महिलेला “बाहेरची बाधा” असल्याचे सांगून भीती घातली. विधीच्या नावाखाली तिला पापनाशक कुंडात अंघोळ घालण्यास लावून ओल्या वस्त्रानिशी उंबराच्या झाडाला फेऱ्या मारण्यास भाग पाडले.

त्यांनतर काही दिवसांनी या भोंदूने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवून तिला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. “दैवी विधी आणि मार्गदर्शनासाठी एकांतात यावे लागेल” असे सांगून त्याने पीडितेला नाशिकमध्ये बोलावून घेतले. तिथून तिला नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेले. “माझ्या गळ्यात रुद्राक्ष आहे, माझ्यात दैवी शक्ती आहे, माझे कोणी काही करू शकत नाही,” अशी धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले.

गुन्हा दाखल

भोंदूंच्या दहशतीमुळे पीडित महिला सुरुवातीला गप्प होती. मात्र तिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हा प्रकार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या कानावर घालण्यात आला. या भोंदूने अशाच प्रकारे अनेक महिला आणि मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याची शक्यता पीडितेने आणि अंनिसने व्यक्त केली आहे. पोलीस अधीक्षणाच्या सूचनेनुसार, लासलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महेशगिरी काकडे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीच्या अटकेसाठी रवाना झाले आहेत. उभा गुन्ह्यात मदत करणाऱ्या साथीदारांनाही सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथे.

  • Que: आरोपीने काय केलं?

    Ans: दैवी शक्ती व भूतबाधा काढण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केला.

  • Que: प्रकरण कसे उघडकीस आले?

    Ans: पीडितेने अंनिसकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Web Title: Nashik crime after ashok kharat maheshgiri babas shocking scandal exposedclaims of divine powers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.