Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: वाढदिवशीच आश्रमशाळेतून निघून गेला…,दोन दिवसांनी 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह झाडाला लटकलेला

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री आश्रमशाळेतील दहावीचा विद्यार्थी संजय नडगे बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी डोंगरावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळला. आत्महत्या की अन्य कारण, याचा तपास पोलीस करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 16, 2026 | 11:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आश्रमशाळेतील 17 वर्षीय विद्यार्थी अचानक बेपत्ता.
  • दोन दिवसांनी शाळेजवळील डोंगरावरील झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.
  • आत्महत्या की अन्य कारण, याचा तपास त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून सुरू.
नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्रमशाळेतील दहावीचा विद्यार्थी कुणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाला, त्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संजय सदू नडगे (वय 17) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. संजय ज्यादिवशी गायब झाला त्या दिवशी त्याच्या वाढदिवस होता. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Ahilyanagar Crime: कीर्तनकाराचा घृणास्पद चेहरा उघड! 5 वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरम पक्कडीने चटके आणि…

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, संजय नडगे हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री माध्यमिक आश्रमशाळेत दहावीत शिक्षण घेत होता. गुरुवारी (दि. 12) दुपारी सुमारे तीनच्या सुमारास तो कोणालाही काहीही न सांगता आश्रमशाळेतून निघून गेला. त्यांनतर तो परत न आल्याने शाळा प्रशासनाला संशय आला. बराच शोध घेतल्यानंतर तो सापडला नाही. अखेर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुनील विठ्ठल जाधव यांनी शुक्रवारी (दि. 13) त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात संजय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. संजय बेपत्ता झाल्यापासून त्याचे आई-वडीलही त्याचा शोध घेत होते.

दोन दिवसांनी लाटलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

रविवारी दुपारच्या सुमारास आश्रमशाळेच्या मागील बाजूस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावरील झाडीत गुरे चारण्यासाठी गेलेल्या काही मुलांना एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी ही माहिती तातडीने आश्रमशाळेत दिली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा पूर्ण होईपर्यंत सांयकाळी झाली होती. त्यांनतर संजयच्या आई- वडिलांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले.

मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह

आश्रमशाळेच्या मागील डोंगरावरील झाडीत विद्यार्थी अभ्यासासाठी जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. संजय नडगे याची जन्मतारीख शाळेच्या नोंदीनुसार 12 मार्च 2009 अशी आहे. संजय हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरात सीमेवर असलेल्या बुरूडपाडा गावातील रहिवासी होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रोजंदारीसाठी स्थलांतर करावे लागत असल्याने संजयला शिक्षणासाठी आश्रमशाळेत ठेवण्यात आले होते. तो काही वर्षांपासून या आश्रमशाळेत निवासी विद्यार्थी म्हणून राहत होता. त्याचे दोन भाऊदेखील याच शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

सखोल तपास सुरु

१२ मार्च रोजी संजयचा वाढदिवस होता. त्याच दिवशी तो आश्रमशाळेतून निघून गेल्याची बाब समोर आली आहे. आता त्याने आत्महत्या केली असेल तर का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

Solapur Crime: नात्याला काळिमा! जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी गरोदर

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री येथील माध्यमिक आश्रमशाळेत ही घटना घडली.

  • Que: मृत विद्यार्थ्याचे नाव काय आहे?

    Ans: संजय सदू नडगे (वय 17) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

  • Que: मृतदेह कुठे आढळला?

    Ans: आश्रमशाळेच्या मागील बाजूस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

Web Title: Nashik crime left the ashram school on his birthday 17 year old students body found hanging from a tree two days later

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
1

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
4

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.